खरकाडा गावातील एक गाव एक गणपती संकल्पना साकारलेल्या बाप्पाचे धुमधडाक्यात विसर्जन
तालुक्यातील खरकाडा गावातील सर्व धर्म समभाव एकोप्याने संघटित होऊन शांतता व सुव्यवस्था गावात नांदावी याकरिता येथील नव तरुणांनी नवनिर्माण सार्वजनिक गणेश मंडळाची गेल्या पंधरा वर्षांपूर्वी स्थापना केली तेव्हापासून या गावात गणेशोत्सव सोहळा साजरा केला जातो.
बाप्पाच्या आगमनापासून गोपालकाल्यापर्यंत दहा दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते 10 सप्टेंबर रोजी येथील बाप्पाचे गोपाल काला करण्यात आला तर 11 सप्टेंबर रोजी गावात भव्य मिरवणूक रॅली काढून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे घोषवाक्य देत दुपारी दोन वाजता वैनगंगा नदीत विसर्जन करण्यात आले


0 टिप्पण्या