नवनियुक्त मुख्याधिकारी यांची गोरगरीब लोकांच्या पोटावर घाव
ब्रह्मपुरी शहरात सार्वजनिक जागेतील तसेच रोडवरील चाय टपरी, पानठेला, भाजीपाला विक्रेते, आणि अन्य दुकान व छोट्या व्यापाऱ्यांवर शासनाच्या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम आदमी पार्टीने पुढाकार. घेतला आहे.
ब्रम्हपुरी नगर परिषद अंतर्गत येथील छोट्या मोठ्या व्यावसायिक लोकांना त्यांची दुकाने हटवण्या करीता नोटीस वजा आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना काळानंतर ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांवर सणासुदीच्या काळात नगर परिषद मुख्याधिकारी यांनी दुकाने हटावन्याचे आदेश देऊन पुन्हा बेरोजगार करण्याची तयारी सुरू केली आणि त्यांनी दिनांक 15 तारखेला आदेश जाहीर केला. शासनाद्वारे गोरगरीब लोकांवर होणाऱ्या सामूहिक अत्याचार समर्थनार्थ आम आदमी पार्टी या कार्यवाहीचा निषेध करीत आहे. आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी तडकाफडकी होणाऱ्या निर्णयावर शासनाच्या लोकांशी संपर्क साधून दिवाळी दसरा या सणांच्या वेळी हटाव मोहीम न करता सदर हटाव मोहीम 1महिना समोर ढकलावी अशी विनंती आम आदमी पार्टी पक्षाच्या वतीने विधानसभा प्रभारी नावेद भाई, तालुका अध्यक्ष दिलीप प्रधान, कोषाध्यक्ष आशूभाऊ, वरिष्ठ नेते अनुकूल भाऊ शेंडे यांनी केली आहे.


0 टिप्पण्या