रक्तवीर सेना फाउंडेशन तर्फे क्रांतिवीर भगतसिंग यांची जयंती साजरी
जयंतीनिमित्य रक्तवीरांचा रक्तदान
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षात देशात क्रांतिचे बीज रोवले, देशातील युवकांना स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. ज्यांनी कधीही स्वतःच्या सुखाची चिंता न करता परिवाराला त्यागून देशाला आपले परिवार बनविले आणि स्वतंत्र्यासाठी आपले प्राण हसत हसत दिले त्या क्रांतिकारी भगतसिंग यांची जयंती रक्तवीर सेना फाउंडेशन तर्फे ब्रम्हपुरी शाखा कार्यालयात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्य रक्तवीर सेनेचे रक्तवीर तालुका कार्यप्रमुख स्वप्नील राऊत व धम्मदीप डांगे यांनी रुग्णांना रक्तदान केले. तर रक्तवीर सेना फाउंडेशन शाखा ब्रम्हपुरी कार्यालयात क्रांतिकारी भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प्राचार्य भाऊरावजी राऊत, तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धनजी दोनाडकर यांनी क्रांतीवीर भगतसिंग यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला व विविध प्रश्नावर मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून राजुभाऊ जयस्वाल, प्रशांतजी राऊत, मोरेश्वरजी ठाकरे होते.
तर कार्यक्रमाचे नियोजन रक्तविर सेनेचे अध्यक्ष निहाल ढोरे, उपाध्यक्ष मायासिंग बावरी,सचिव प्रदिप दर्वे,सहसचिव रूपम शिवुरकार, कोषाध्यक्ष प्रणय ठाकरे,सत्यपाल गोठे,जिल्हा कार्य प्रमुख प्रज्वल जनबंधु,जिल्हा नियोजन प्रमुख तुषार भागड़कर यांनी केला.
कार्यक्रमात पवन बेदरे, सतीश दर्वे, सचिन तलमले, सागर मेश्राम, अमोल सलामे, यश नंदेश्वर, संदिप कामडी, अमोल ठेंगरी, अक्षय खेवले, प्रविण कुथे,अतुल मेश्राम,प्रफुल ढोक,श्रीगणेश बुराडे,कपिल घोरमोडे,नयन सेलोटे,हर्षल फाये,दिपक नन्नावरे व अन्य रक्तविर उपस्थित होते.


0 टिप्पण्या