हळदा येथील तंटामुक्त पदाधिकाऱ्यांना अवैध दारूविक्रेत्यांकडुन मारहाण
दाेन पदाधिकाऱ्यांना जातिवाचक शिवीगाळ
हळदा गावात शांतता व सुव्यवस्था रहावी,सामाजिक सलाेखा टिकुन कायम रहावा या सामाजिक हेतुने ग्रामपंचायत कार्यालय जवळील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी प्रयत्न करणा-या तंटामुक्त समिती व शाळा व्यवस्थापन समितीच्या
पदाधिकाऱ्यांना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचे धमकी दिल्याची घटना२४ सप्टेंबरला सायंकाळी हळदा येथे घडली असून पाेलीसांनी दाेन आराेपींना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अनेक वर्षापासून हळदा येथील ग्रामपंचायत कार्यालय समाेर अवैध दारूची दुकाने असुन गावातील विविध समितीचे पदाधिकारी व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने या चाैकातील अवैध दारूची दुकाने हटविण्यासाठी पुढाकार घेऊन मागील महिन्यात ठाणेदारांना निवेदन दिले.
पाेलीसांनी या निवेदनाची दखल घेत अवैध दारूविक्रेत्यांच्या विराेधात धाडसुत्र सुरू केले.या धाडसत्राचा धसका घेतलेल्या गुंड प्रवृत्तीचे दाेन अवैध दारूविक्रेते सेवकसिंग गुरूदिपसिंग टांक (वय २४) व गाेविंदसिंग बलबिरसिंग टांक (२५) हे शनिवारला सायंकाळी ६.३० ला गावातील लाईट बंद करून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लुमदेव दामाेधर खेवले यांच्या कापड दुकानमध्ये जाऊन मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. लगेच लुमदेव दामाेधर खेवले (४२) यांनी तंटामुक्त समितीचे सचिव संजय दयाराम लाेणारे (वय ४८) लाेणारे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लतिफ गुलाब लाेणारे (वय ३८) यांना फाेन लावुन बाेलावले. यानंतर संजय लाेणारे व लतिफ लाेणारे घटनास्थळी दाखल झाले.यानंतर दाेन्ही अवैध दारू विक्री करणा-या आराेपींनी या दाेघांनाही मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली व पळुन गेले.
यानंतर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लुमदेव खेवले, सचिव संजय लाेणारे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लतिफ लाेणारे यांनी ब्रम्हपुरी पाेलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली.पाेलीसांनी तक्रारीची दखल घेत कलम २९४,३२३,३४ अन्वये तसेच अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतीबंधक अधिनियम 3 (1) व 3 (1) s अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास मुलचे उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे हे आज तपास करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले व तपास सुरू केला असुन ब्रम्हपुरी पाेलीसा़नी या दाेन्ही आराेपींना अटक केली आहे. परिसरातील कुडेसावली, हळदा येथील अवैध दारूविक्रेते मुजाेर झाले असुन गावातील पदाधिकारी यांनाही जुमानत नाहि. पाेलीसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा एखाद्या पदाधिका-यासाेबत अनुचित प्रकार घडण्याचे नाकारता येणार नाही. गावाची शांतता भंग होत असून अराजकता पसरवण्यासाठी वारंवार हा अवैध दारू विक्री व्यवसाय कारणीभूत ठरत आहे.



0 टिप्पण्या