Advertisement

सर्व प्रवाशी रेल्वे पुर्ववत चालु कराव्यात

सर्व प्रवाशी रेल्वे पुर्ववत चालु कराव्यात

वंचित बहुजन महिला आघाडीचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

दिनांक 21:09:2022 बुधवार ला वंचित बहुजन महिला आघाडी द्वारे उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी मार्फत  रेल्वेमंत्री, यांना सकाळी 7:00 वाजता गोंदिया ते चंद्रपुर ला जाणारी व सध्याकाळी 6:30 वाजता चंद्रपुर वरून गोदिंया ला जाणारी जी ब्रम्हपुरी येथे रात्री ला 9:00 वाजता येते कोरोना काळापासुन चंद्रपुर ते गोदिंया, व गोंदीया ते चंद्रपुर येणार्या जाणार्या रेल्वे बंद केल्या असुन प्रवाशांना कोर्टाची कामे असतात व कर्मचार्यांना कार्यालयात जाणे येणे करण्यास अडचन निर्माण होत असुन व काही खाजगी कामाकरिता ये- जा  करणाऱ्यांना सुद्धा रेल्वे बंद असल्यामुळे त्रास होत असुन  या सर्व प्रवाशी रेल्वे पुर्ववत चालु कराव्यात अशी  मागणी नीवेदनात करण्यात आली. निवेदन देताना वंचित बहुजन महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षा लीनाताई रामटेके, लता मेश्राम,मृणालीनी सहारे, प्रतीमा डांगे, करूणा मेश्राम,वंदना गोस्वामी, सुप्रीया तलमले, डीम्पल तलमले व इतर कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या