Advertisement

सन्मित्र क्रीडा मंडळ तर्फे राज्यस्तरीय आमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेचे विजेत्यांना पुरस्कार वितरण

सन्मित्र क्रीडा मंडळ तर्फे राज्यस्तरीय आमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेचे विजेत्यांना पुरस्कार वितरण

स्वर्गीय प्राध्यापक प्रकाश आयदे सर स्मृती प्रित्यर्थ सन्मित्र क्रीडा मंडळ ब्रह्मपुरी द्वारा राज्यस्तरीय आमंत्रित बास्केटबॉल स्पर्धाचे आयोजन ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय चे प्रांगणात करण्यात आले होते.या स्पर्धेत महाराष्ट्रातून एकूण 12 ओपन आमंत्रित बॉस्केटबाॅल चमु दाखल झाल्या होत्या.ही स्पर्धा दोन दिवसीय घेण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार स्वगीय ओंकारलालजी जाजू स्मृती चषक व रोख 15 हजार ब्रम्हपुरी येथील एस.के.एम चमुने पटकावले आहे.द्वितीय पुरस्कार स्वगीय भय्याजी नागरे स्मृती चषक व रोख 10 हजार नागपूर येथील एन.बि.वा.एस चमुने पटकावले आहे तृतीय पुरस्कार स्वगीय अभिजित जगनाडे स्मृती चषक व रोख 07 हजार नांदेड येथील एन.बी.ए चमुने पटकावले आहे.

बेस्ट प्लेअर म्हणून पुरस्कार नांदेड येथील शरवील याने मान पटकावला आहे.तर बेस्ट शुटर म्हणून नांदेड येथील आशिष रेनापुरकर तसेच स्पर्धेतील सर्वत्कृष्ठ खेळाडू म्हणून ब्रम्हपुरी येथील शुभम राऊत यांने मान पटकावला आहे.व्यासपीठावर उपस्थित मान्यवर खासदार अशोकजी नेते लोकसभा क्षेञ गडचिरोली,डाॅक्टर आमदार रामदासजी आंबटकर सदस्य विधानपरिषद,धनेश अग्रवाल,रमेश छाबडा,राजेश जाजू,अशोक पटेल,सुभाष अग्रवाल,डाॅक्टर रविशंकर आकरे,डाॅक्टर यादव लंजे,अमित मेंदुले,डाॅक्टर अतुल नागरे,नितीन उराडे,डाॅक्टर कपिल अन्नलदेवार,डाॅक्टर शिशिर वंजारी,शञुघ्न गोखले,रवीजी कुलकर्णी,यांच्या हस्ते बाॅस्केटबाॅल स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना स्मृती चिन्हे व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या दरम्यान ही स्पर्धा सन्मिञ क्रिडा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक अतुल देशकर माजी आमदार,प्रार्चाय डाॅक्टर देविदासजी जगनाडे,प्राध्यापक उमेश मिश्रा,सचिव सि.पी.जेम्स,अतुल पाटील,प्रकाश लोखंडे,मनोज वठे,अन्वर शेख,प्राध्यापक डाॅक्टर संजय कुंभारे,प्राध्यापक दिलीप जगनाडे,प्राध्यापक संजय लांबे,पवन जयस्वाल,आशिष कोसे,अभिजित कोसे,अक्षय रगडे,नफीस खान,डाॅक्टर प्रशांत राठी,मिलिंद पाठक,आदी पदाधिकारी व सदस्य गणांनानी ही बाॅस्केटबाॅल स्पर्धा यशस्वी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या