Advertisement

छत्रपती शाहू महाराज पाणी वापर संस्थेची अध्यक्ष निवड

छत्रपती शाहू महाराज पाणी वापर संस्थेची अध्यक्ष निवड

छत्रपती शाहू महाराज पाणी वापर संस्था, धानोली पोहा या संस्थेची अध्यक्ष निवड सभा चौगान येथील एफ. पी. सी. च्या कार्यालयात पार पडली. सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी या पाणी वापर संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. संचालक मंडळाची निवड करून परिसरातील पाणी वापर संस्थांसाठी या संस्थेने एक आदर्श घालून दिला.

अध्यक्ष निवड प्रक्रियेच्या वेळी गोसेखुर्द उजवा कालवा विभाग ब्रम्हपुरी येथील उपविभाग क्रमांक ६ चे कनिष्ठ अभियंता अमित लोखंडे साहेब तसेच पाणी वापर संस्था सक्षमीकरण प्रकल्पातील मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठाचे प्रकल्पस्तरीय समन्वयक शशांक रायबोर्डे, सामाजिक कार्यकर्ते मनोज कोरडे, क्षेत्रीय समन्वयक राहुल सिंगनजुडे उपस्थित होते.

या सभेत निवडून आलेल्या बाराही संचालकांनी एकमताने शेवटच्या मतदार संघातील चौगाण येथील संचालक संजय ऋषी ननावरे यांची पहिल्या दोन वर्षाकरिता अध्यक्ष म्हणून निवड केली. तसेच उपाध्यक्ष म्हणून पांडुरंग नामदेव दिघोरे (बेटाळा) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच आधीच्या कार्यकाळात उत्कृष्ठपणे काम पाहणारे सचिव किशोर बळीराम धोंगडे यांनाच सचिव पदी सर्वानुमते कायम करण्यात आले.

यावेळी पाणी वापर संस्थेचे संचालक म्हणून निवडणून आलेले सदस्य अशोक पारधी (धानोली पो.), अशोक ढोंगे(मालडोंगरी), रेखा धोंगडे(धानोली पो),  नीलिमा नागमोती(मालडोंगरी),  देवाजी ढोंगे(बेटाळा), उद्धव पिलारे(मालडोंगरी), केवळराम ननावरे(चौगान), ईश्वर पिलारे(बेटाळा), कालिंदाबाई चहांदे(चौगान) इत्यादी उपस्थित होते.

विभागाचे अधिकारी लोखंडे सर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच संपूर्ण संचालक मंडळाचे अभिनंदन केले. तसेच पाणी वापर संस्था आणि पुढील काळातील प्रवास यासंबंधी शशांक रायबोर्डे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सचिव किशोर धोंगडे यांनी सर्वांचे आभार मानले.

सूत्रसंचालन मनोज कोरडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या