Advertisement

सद्गुरु श्री संत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी निमित्य गुरुकुंज मोझरी साठी भुवैकुंठ अड्याल टेकडी येथूनपालखी ०१/१०/२०२२ ला निघणार

सद्गुरु श्री संत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी निमित्य गुरुकुंज मोझरी साठी भुवैकुंठ अड्याल टेकडी येथून पालखी ०१/१०/२०२२ ला निघणार

ब्रम्हपुरी-सद्गुरु श्री संत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी निमित्य गुरुकुंज मोझरी, जि. अमरावती येथे दरवर्शी शेकडो पालख्या गावा-गावतुन ग्रामगीता, अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार भजन कीर्तन प्रवचन करीत जात असतात. त्या निमित्य अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम संचलित मोझरी श्री गुरुदेव आत्मानुसंधान भु- वैकुंठ अड्याळ टेकडी ता. ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर येथुन दरवर्षी पालखी पदयात्रा गुरुकुंजात जात असते. ही पालखी पदयात्रा आत्मानुसंधान भू- वैकुंठ अड्याळ टेकडी वरुण दी. ०११०२०२२  शनिवारला सकाळी ९.०० वाजता निघणार आहे.पालखी पदयात्रेत सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, सत्संग, ग्रामगीता प्रणित तत्वज्ञान, ग्रामसभा, युवा संघटना, उपचार मार्गदर्शन, स्वयं-समर्थन स्वयंपूर्ण खेडी उभी करणे,  निरोगी जीवन, आदर्श दिनचर्या, संत साहित्यिक मार्गदर्शन करण्यात येणार आह. 01 ऑक्टोंबर 2022 ला निघनाऱ्या पालखी पदयात्रेचे संपूर्ण संचालन आणि नेतृत्व  चेतनभाऊ कवडकर पालखी प्रमुख आत्मानुसंधान अड्याळ टेकडी यांच्यकडे आहे,

 या पालखी पदयात्रेत बहुसंख्य गुरुदेव भक्तानी व आईभगिनी युवकांनी पदयात्रा महोत्सवात सहभागी व्हावे असे आत्मानुसंधान भुवैकुंठ समिती तर्फे कळविण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या