Advertisement

भाजपा पदाधिकार्यांनी शंकर चहांदे व योगेश वाडीभस्मे यांचा केला सत्कार

भाजपा पदाधिकार्यांनी शंकर चहांदे व योगेश वाडीभस्मे यांचा केला सत्कार

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे व माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे यांचा पुन्हा भाजपा मध्ये प्रवेश झाल्याबद्दल भाजपा कार्यालय कांद्री येथे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

रविवार ला कोराडी येथे आयोजित जनता दरबार मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी राष्ट्रीय परिषद सदस्य व कन्हान – पिपरी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष मा.शंकर चहांदे व माजी जिल्हापरिषद सदस्य मा.योगेश वाडीभस्मे यांना पुन पक्षात घेऊन भाजप चा दुपट्टा व पुष्प गुच्छ देऊन स्वागत केल्याने कन्हान , कांद्री भाजपा पदाधिकार्यांन मध्ये उत्साह चे वातावरण निर्माण झाल्याने सोमवार ला कांद्री येथे भाजपा कार्यालयात स्वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , व कांद्री शहर अध्यक्ष गुरुदेव चकोले यांच्या नेतृत्वात कन्हान – पिपरी नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष

शंकर चहांदे व माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

या प्रसंगी नरेश पोटभरे ,सुरेंद्र चटप,राहुल वंजारी, कामेश्वर शर्मा , सुनिल लाडेकर , सुरेंद्र बुधे , अजय लोंढे , सुषमा मस्के , लोकेश आंबाळकर ,चक्रधर आकरे,पंकज सिंग, संजय चोपकर , सौरभ पोटभरे , हितेश साठवणे , ऋषभ बावनकर , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या