कांद्री येथे भव्य महाआरोग्य अभियान शुभारंभ करुन रोगनिदान , उपचार शिबीर कार्यक्रम थाटात संपन्न
१६० नागरिकांनी घेतला शिबीराचा लाभ
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कांद्री येथे स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव निमित्य भुमीपुत्र युवा प्रतिष्ठाण बहुद्देशीय संस्था भुमीपुत्र महिला स्वयं सहायता बचत गट , कांद्री शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर , वानाडोंगरी , नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य अभियानाचा शुभारंभ करुन रोगनिदान , उपचार शिबीरात एकुण १६० नागरिकांनी शिबीराचा लाभ घेऊन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
बुधवार दि १० ऑगस्ट ला शिव हनुमान मंदिर , धर्मराज शाळेच्या मागे संताजी नगर कांद्री येथे
भुमीपुत्र युवा प्रतिष्ठाण बहुद्देशीय संस्था भुमीपुत्र महिला स्वयं सहायता बचत गट , कांद्री शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर , वानाडोंगरी , नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य अभियानाचा शुभारंभ व रोगनिदान , उपचार शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मा.आमदार आशीष जी जैस्वाल यांचा हस्ते हनुमान मंदिरात पुजा अर्चना करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .या शिबिरात मेडिसिन , स्त्रीरोग , बालरोग , अस्थिरोग , नेत्ररोग , शल्यचिकित्सक , कान – नाक – घसा , त्वचारोग व दंतरोग तज्ञ या विभागाचे तज्ञ डॉक्टर्स प्रामुख्याने उपस्थित होते . या शिबीराचा एकुण १६० नागरिकांची तपासणी करण्यात आली असुन रक्तदाब व मधुमेह तपासणी आणि शिबीर स्थळावर उपलब्ध औषधीचे वितरण करण्यात आले .
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर तपासणी रूग्णालयात निःशुल्क करण्यात येणार असुन शिबीर स्थळावरून रूग्णालयात जाण्याकरीता वाहनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे .
या प्रसंगी अतुल हजारे , रामभाऊ दिवटे , शिवाजी चकोलें , नरेश पोटभारे , गुरुदेव चकोले , सौरभ पोटभरे , दिनेश राऊत , अजय चवेले , सुरेंद्र चटप , अमर कुंभलकर , संजय लांडगे , प्रफुल हजारे , मनोज वडे , सोनू नाइक ,सतीश झलके, शुभम यादव ,बंटी यादव ,दिनेश राउत, अजय चवेले, विक्रम कुंभलकर , अमर कुंम्भ ओम हजारे , उमेश लोनारे , अजय राठौड़ , श्रेयश जिंगरे , पियूष राजनकर , अरुणा हजारे , वंदना गडे , मिरा कुंभलकर ,राखी गभने , शारदा झिंगरे , शोभा मंगर , सविता ठाकरे , प्रीती लंगडे , पल्लवी शर्मा , रीता राजांकर , रितू मस्के , ज्योती दाडे , सिंधू बुरे , प्रिया मस्के , रीता सुनीता भिवकर , सूनिता चटप , दुर्गा भुते , ज्योती गुप्ता , स्मिता लांडगे , बबली सिंग , जिजाबाई लोणारे , नंदिनी हजारे सह आदि नागरिक व महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते .


0 टिप्पण्या