Advertisement

संपुर्ण ताकदीने स्वतंत्र निवडणूक लढणार.. वंचित बहुजन आघाड़ी

संपुर्ण ताकदीने स्वतंत्र निवडणूक लढणार.. वंचित बहुजन आघाड़ी

नागभिड विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाड़ीची होणा-या प. स , जि .प , व नगरपरिषद , च्या निवडणुकी संदर्भात आढावा सभा घेण्यात आली यावेळी पुर्वविदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर यांनी होणा-या जि .प , प.स , व नगरपरिषद च्या निवडणुका जनसामान्याच्या हक्कासाठी जनमानसाच्या सोबतीने संपुर्ण ताकदीने स्वतंत्र वंचित बहुजन आघाड़ी निवडणुक लढवेल . तालुका पदाधिकारी , कार्यकर्त्यानी सुसंवाद , आपुलकी जोपासीत बहुजनांना सोबत घेत गाव शाखा गठन करीत संघटन मजबूत करावे व पक्षाचे विचार लोकांपर्यत पोहचवावे असे मार्गदर्शन केले. कांग्रेस ,बीजेपीच्या नाकर्तेपनामुळे संविधानीक एस सी, एसटी चे पदोन्नति चे आरक्षण गेले आहे. बहुजनांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाड़ी ने सरकार कडे विळोवेळी मांगणी करीत आंदोलने केली आणि हा लढा समोर ही वंचित बहुजन आघाड़ी सुरु ठेवेल.

मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचितांना राजकीय सत्तेची दारे खुली करण्यासाठी अहोरात्र झटणा-या वंचित बहुजन आघाड़ी सोबत बहुजनांनी एकसंघ राहावे असे मत अश्विन मेश्राम यांनी व्यक्त केले. तालुकाध्यक्ष खेमदेव गेडाम यांनी वंचित बहुजन आघाड़ी सर्वसामान्य लोकांचा पक्ष असुन संघटीत होण्याची गरज आहे असे म्हटले तर जिल्हा महीला उपाध्यक्ष लिनाताई रामटेके यांनी महीलांनी आंबेडकरवादी अस्मिता जागी ठेवीत वंचित बहुजन आघाड़ी सोबत राहावे असे आवाहन केले. सुत्रसंचालन राजकुमार मेश्राम यांनी केले यावेळी पक्षाचे जिल्हा महीला सचिव कल्पना खरात , शहरअध्यक्ष मानिक दोहीतरे , मधुकर भरडे,धर्मविर गराडकार, संजय बांबोळे, पुंडलिक नाकतोडे,युवराज बोदेले,दुवादास मेश्राम,डाँ गौतम खोब्रागडे,किशोर मेंढे,गणेश भुते, सौ.अश्विनी बागडे,सुकेशनी रामटेके,मनोहर खोब्रागडे, हिवराज मेश्राम,रविंद्र खोब्रागडे, आंनद मेश्राम, काशिनाथ श्यामकुळे, प्रकाश वाकडे, कृष्णदास मेश्राम, सुभाष रामटेके, अंबादास धोंगडे, अभिषेक रामटेके,मोहन बागडे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या