सेवा सहकारी सोसायटी येसंबा च्या अध्यक्ष पदी श्री.बबनराव घरजाळे यांची निवड
उपाध्यक्ष पदी कृष्णा महाल्ले यांची निवड
कन्हान – सेवा सहकारी सोसायटी येसंबा च्या अध्यक्ष पदी मा.बबनराव काशीनाथ घरजाळे व उपाध्यक्ष पदी कृष्णा महाल्ले यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आल्याने सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते बबनराव घरजाळे व कृष्णा महाल्ले यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले .
गुरुवार दिनांक ०४ आॅगस्ट ला येसंबा ग्रामपंचायत सरपंच मा.धनराज हारोडे यांच्या अध्यक्षतेखाली सेवा सहकारी सोसायटी येसंबा ची निवडणुक घेण्यात आली.सेवा सहकारी सोसायटी येसंबाचे नवनियुक्त अध्यक्ष मा.बबनराव काशीनाथ घरजाळे , उपाध्यक्ष .कृष्णा आनंदराव महाल्ले यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली .
यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य व सरपंच मा.धनराज हारोडे , माणिकराव महाले , मधुकर चकोले , भोजराज घरजाळे , सुनिल महाल्ले , सेवक राऊत ,सौ. वच्छलाबाई धुर्वे ,सौ . इंदुबाई भोंदे , सुखदेव पानतावणे , ज्ञानेश्वर चकोले ,यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निवडणुक घेण्यात आली असुन सरपंच मा.धनराज हारोडे यांच्या हस्ते अध्यक्ष बबनराव घरजाळे व उपाध्यक्ष कृष्णा महाल्ले यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
कन्हान प्रतिनिधि -ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या