Advertisement

चौगान येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा

चौगान येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा

1997 पासुन सुरु झालेली परंपरा आजतागायत थाटामाटात सुरु

 

ब्रम्हपुरी पासून १० की.मी. अंतरावर असलेल्या चौगान या गावी १९९७ पासुन तान्हा पोळा मोठ्या संख्येने थाटामाटात साजरा केला जात होता परंतु मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये तान्हा पोळा साजरा करता आला नव्हता. परंतु कोरोनाचे सर्व निर्बंध

हटविली असल्याने या वर्षी मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा करण्यात आला.
गावचे पोलिस पाटील किशोर तिडके यांच्या पुढाकाराने प्रत्येक वर्षी हनुमान देवस्थान मंदीर चौगान येथे तान्हा पोळ्याचे आयोजन केले जाते. त्यात गावांतील बालगोपाल आपल्या नंदीबैला सोबत सहभागी होतात. आयोजकांच्या वतीने नंदीबैलाची विधिवत पूजा करून उत्कृष्ट सजावट व नंदीबैलासाठी बक्षीस देण्यात येतो. या वर्षी सुद्धा तब्बल दोन वर्षांनंतर तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला. गावातली बालगोपाल मंडळी आपल्या सजविलेल्या नंदीबैला सोबत सहभागी झालेत. मुलांनी परिश्रम घेऊन नंदी बैलाला फुलांची हार, रंगरांगोटी, रंगीबिरंगी लायटिंग लावून नंदीबैल सजविला होता. बालगोपाल, गावकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन तान्हा पोळ्याची शोभा वाढवली. उत्कृष्ट नंदी सजावटीसाठी चौगानचे पोलीस पाटील किशोर तिडके यांच्या वतीने बक्षिसे सुद्धा देण्यात आले. यात प्रथम पारितोषिक वरुण विकास देव्हारी, द्वितीय पारितोषिक छबुताई पुरुषोत्तम मातेरे, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक दर्ष प्रफुल अर्जुनकार, किटा प्रमोद बुराडे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी किशोर तिडके, मनीष घाटबांधे, श्रीहरी देवगडे, सुरेश गुनशेटवार, भगवान प्रधान, प्रा. संतोष पिलारे, अंकुश दानी, मोरेश्वर पारधी, अरुण अर्जूनकार हिरालाल नवघडे तसेच गावातील नागरिक व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या