75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्य गांधी चौक कन्हान येथे सर्वधर्म समभाव संघटनेच्या वतीने गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर चे वितरण
कन्हान:- 75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्य गांधी चौक कन्हान येथे सर्वधर्म समभाव संघटनेच्या वतीने गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर चे वितरण करून 75 वा आजादिका अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
गांधी चौक कन्हान येथे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी 75 व्या स्वातंत्र्य महोत्सव दिना निमित्य सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी कन्हान शहरातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर चे वितरण करण्यात आले. तसेच बुंदी वाटप करून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.
ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कन्हान ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास काळे तसेच कन्हान नगर परिषद चे उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगर सेविका गुंफा तिडके,रेखा टोहने, त्याच बरोबर प्रामुख्यानी उपस्थित सर्व धर्म समभाव संघटनेचे सदस्य चंदन मेश्राम प्रशांत मसार, गणेश खाडेकर, दिलीप निम्बाने, कुंदन रामगुंडे,अविनाश हातागडे, साबीर, इत्यादींनी कार्यक्रम आयोजन करून परिश्रम घेतले.



0 टिप्पण्या