Advertisement

लाचखोरी प्रकरणात तलाठ्यांची चौकशी

लाचखोरी प्रकरणात तलाठ्यांची चौकशी

केंद्रिय लोकशाही पत्रकार संघ ब्रम्हपुरीने केली होती तक्रार

राहुल भोयर ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी

महसूल विभाग ब्रम्हपुरी येथील तलाठी कर्मचाऱ्यांनी छान्नव (९६) हजार रुपयाचे परस्पर आर्थिक व्यवहार करून आपसी समझोत्याने पाहार्णी येथील दोन व तोरगाव येथील एक वाहन सोडून दिल्याची लेखी तक्रार स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केंद्रिय लोकशाही पत्रकार संघ ब्रम्हपुरीच्या पत्रकारांना देली असता लाचखोर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी व तस्करीला लगाम यावा अशी विनंती केली होती. याबाबत स्थानिक वृत्तपत्रांमधून बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्यात तर केंद्रिय लोकशाही पत्रकार संघ ब्रम्हपुरीच्या पत्रकारांच्या शिष्टमंडळा तर्फे उप विभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना भेटून निवेदन देतं कारवाई ची मागणी करण्यात आली होती. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या वाहण धारकासह परस्पर आर्थिक व्यवहार करीत कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून लाचखोरी चे प्रकार तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याने तालुक्याच्या प्रतिमेला महसूल प्रशासनाच्या लाचखोरीने धक्का लागत असून तालुक्याची सर्वत्र बदनामी होत आहे. सदरची तक्रार मंत्रालयापर्यंत गेली असून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात तक्रार कर्त्यांना न्याय मिळतो की तलाठ्यांच्या बाजूने निर्वाळा मिळतो हे चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या