मालडोंगरी गावाची आदर्श गाव म्हणून निवड झाल्याने आरोग्य शिबिराचे आयोजन
ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी गावाची या वर्षाला आदर्श गाव म्हणून निवड करण्यात आली त्या अनुषंगाने मालडोंगरी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन श्रीमती मंजुषा ठाकरे सरपंच मालडोंगरी हया होत्या तर यावेळी विनोद घोरमोडे उपसरपंच, सुखदेवे पी एस सी मेडीकल आफिसर चौगाण, वाळके मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थीत होती.
शिबिर यशस्वी होण्याकरीता चौगाण पी एच सी चे सर्व आरोग्य कर्मचारी, आशा, ग्रा.प.कर्मचारी, आंगणवाडी कार्यकर्ते, तज्ञ डॉक्टर. यांनी मोठे योगदान दिले. .
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित डॉ सुखदेवे यांनी आदर्श गाव तसेच शिबिराचे महत्व पटवून दिले. मंजुषा ठाकरे यांनी कार्यक्रमाबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक वाळके सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिता खामनकर यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन सम्यंक गजभिये यांनी केले . कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी मोठ्या् उत्साहाने प्रतिसाद दिला.


0 टिप्पण्या