नागपूर: बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने आज डागा हॉस्पिटल परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.सदर धरणे आंदोलन स्वाती गेडाम ही महिला सफाई कर्मचारी गेल्या बारा वर्षापासून डागा स्मृति स्मृति स्त्री रुग्णालय येथे सफाई कर्मचारी म्हणून काम करीत आहे.
परंतु तिला कंत्राटदार ज्वाला सिक्युरिटी फोर्स यांनी कोणतेही तर्कसंगत कारण न सांगता कामावरून काढून टाकले .तिला पुन्हा कामावर रूजू करण्यात यावे, याकरिता बहुजन मुक्ती पार्टी नी यापूर्वी वैद्यकीय अधीक्षीका डॉक्टर सीमा पारवेकर यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर सकारात्मक कारवाई नाही झाल्याने बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने अनिल नागरे यांचे नेतृत्वात धरना प्रदर्शन करण्यात आले.
या आंदोलनात किमान वेतन कायदा 1948, पगार कॅश मध्ये न देता पारदर्शी नोंदणी करून द्यावे, कंत्राटदार जरी बदलला तरी जुन्या कर्मचाऱ्यास बदलण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या मागण्याचे पत्र देण्यात आले.सदर धरणा आंदोलनात राजेश तामगाडगे ,राजेश बडोले ,कांतारामजी वानखेडे, अशोक घोरपडे ,उत्तम प्रकाश सहारे, सचिन सोयाम प्रामुख्याने उपस्थित झाले. यांना पुन्हा कामावर रूजू नाही केल्यास एक जुलै 2022 ला रॅली प्रदर्शन करण्यात येईल व आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे सांगण्यात आले.


0 टिप्पण्या