Advertisement

सुरगाणा तालुक्यात संततधार पाऊस पावसामुळे घर कोसळले जीवितहानी नाही

सुरगाणा तालुक्यात संततधार पाऊस पावसामुळे घर कोसळले जीवितहानी नाही

सुरगाणा: तालुक्यात सात ते आठ दिवसापासून असलेल्या संततधार पावसामुळे भदर ग्रामपंचायत मधील नवापूर येथील बाळू तुळशीराम गावित यांच्या राहते घर पावसात कोसळल्याने भिंत, वासे,कौल, यांचे फार मोठे नुकसान झाले आहे,संततधार पावसामुळे लाकडाची झीज ओली होऊन भिंती कोसळल्या भर दुपारी 11 ते 12 सुमारास ही घटना घडली सुदैवाने घरातील सर्व मंडळी शेतामध्ये असल्याने बचावले अन्यथा खूप मोठी दुर्घटना घडली असती,गावित कुटुंबाला आता राहायचे कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

घरातील संसार उपयोगी साहित्य व धान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. या घटनेची नैसर्गिक आपत्ती कक्षाने गंभीर दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून त्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी हे कुटुंब करत आहे,

प्रतिनिधी, गणेश गाडेकर सुरगाणा-नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या