गोंडेगाव खदान चा एका ट्रकने कोळसा चोरून ट्रक चालक पळाला
जिवे मारण्याची धमकी देत २० टन कोळसा १ लाखाचा माल ट्रक सह घेऊन आरोपी पळाला
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस आठ किलो मीटर अंतरावर गोंडेगाव माइंन्स कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक टिप्पर ट्रक कोळसा चोरून पळवुन जात असतांना दिसल्याने पाठलाग करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने टिप्पर थांबविला असता ट्रक मधुन क्लिनर साईड ने एक अनोळखी इसम जवळ येऊन शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोलीसांनी विनोद कोचे यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार विनोद भाऊराव कोचे हे आपल्या ड्युटीवर हजर असता छटवार कंपनीचे सुपर वाईजर राम शाह यांनी फोन करून विनोद कोचे यांना माहिती दिली की, खदान मध्ये जाणाऱ्या रोड ने एक टिप्पर येत आहे. सदर टिप्पर संश्यास्द वाटत असल्याने विनोद कोचे यांनी जाऊन पाहिले असता एक पिवळ्या रंगाचा टिप्पर गोंडेगाव माइंन्स कडे जाणाऱ्या रस्त्यावर जातांना दिसला असता त्याचा पाठलाग करून सदर टिप्पर थांबविण्याचा प्रयत्न केला असता टिप्पर ट्रक चालकाने टिप्पर थांबविले नाही व जुनीकामठी कडे जाणाऱ्या रोड ने टिप्पर घेऊन गेला व जुनीकामठी कडे जाणाऱ्या वळणावर टिप्पर ट्रक चालकाने टिप्पर थांबवुन टिप्पर मधुन क्लिनर साईड ने तोंडाला दुपट्टा बांधुन हातात राॅड सारखी वस्तु घेवुन एक अनोळखी इसम विनोद कोचे यांचा जवळ आला व शिवीगाळ करून म्हणाला की, तुम लोग वापस जाओ नही तो तुम्हारा काम खत्म कर दुंगा अशी धमकी देऊन टिप्पर मध्ये भरलेला अंदाजे २० टन दगडी कोळसा किंमत १,००,००० रुपयाचा मुद्देमाल जबरी चोरी करून पळुन गेला.
अश्या फिर्यादी विनोद कोचे यांच्या तोंडी तक्ररीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३९२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या