प्रहारच्या दणक्याने अवैध वाळू तस्करीतील चार टिप्पर जप्त
प्रशासनाचा सहकार्य उशिरा लाभल्याने दोन टिप्पर चालक वाहन सोडून फरार
प्रहार संघटने तर्फे वाळू तस्करीवर कारवाई करण्याबाबत दिलेल्या निवेदनाची कुठलीही दखल न घेतल्याने 31 मे मंगळवार च्या रात्री अकराच्या सुमारास ब्रम्हपुरीच्या प्रहार संघटने कडून धडक कारवाई करण्यात येत अवैध वाळू तस्करीतील चार टिप्पर वाहण चालकाकडे कुठलीही रॉयल्टी नसल्याने दोन टिप्पर थेट पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे जमा केले तर दोन टिप्पर चालक, प्रशासनाच्या कारवाईला उशिरा झाल्याने टिप्पर सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.
प्रहार संघटने कडून मंगळवारला रात्रौ च्या दरम्यान झालेल्या धाडसी कारवाई ने निद्रावस्तेत असलेल्या प्रशासनाची चांगलीच झोप मोड झाल्याचे सदर कारवाई वरून दिसून येत आहे. अकरा वाजता पकडण्यात आलेल्या वाहणांना कारवाई साठी महसूल व पोलीस प्रशासनाला वारंवार सूचना दिली असता स्थानिक प्रशासनाचे कुठलेली सहकार्य लाभत नसल्याने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना फोन द्वारे माहिती देतं मदत मागितल्याने स्थानिक पोलीस प्रशासन खळबळून जागा झाला व तब्बल एक ते दीड तासानंतर का होईना पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तो पर्यंत दोन टिप्पर चालक घटनास्थळावर वाहन सोडून देतं पळून जाण्यात यशस्वी झाले तर दोन टिप्पर चालकांनी वाहन पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे जमा केले.
पळून गेलेल्या चालकांचे वाहन घटनास्थळी असल्याने पोलीस प्रशासना कडून देखरेखी खाली बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. सदर घटने वरून ब्रम्हपुरी तालुक्यात खुलेआम वाळू तस्करी होतं असल्याचे उघड सत्य जिल्ह्याच्या पटलावर स्पष्ट झाले आहे. तर लाचखोर अधिकारी आर्थिक लाभासाठी वाळू तस्करीला मोकळीक देतं असल्याने भविष्यात साधारण जनता रस्त्यावर उतरत अशा प्रकाराला आळा घालून बंदोबस्त करत असल्याने प्रशासनाची नाचक्की होतं असल्याने सर्वत्र नागरिकांच्या चर्चेचा विषय होतं आहे
राहुल भोयर


0 टिप्पण्या