Advertisement

हळदा येथील दोघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा.

हळदा येथील दोघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा

उपवनसंरक्षक, पालकमंत्री, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना गावकऱ्यांचा निवेदन.

अन्यथा वन विभाग कार्यालय समोर ठिय्या आंदोलन.

ब्रम्हपुरी–गेल्या दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला तर एक शेतकरी कसाबसा बचावला त्यामुळे हळदा सह परिसरातील जनतेमध्ये वन विभागा प्रति तीव्र असंतोष निर्माण झाला असून येत्या 5 दिवसात त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा वनविभाग कार्यालय समोर दि 2162022 पासून  बेमुदत ठिय्या आंदोलन व त्याचं दिवशी पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार यांच्या ब्रम्हपुरी येथील जण संपर्क कार्यालय समोर तीव्र निदर्शने करणार असल्याचे मागणीचे निवेदन किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात हळदा येथील जनतेनी पालकमंत्री, उपवनसंरक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिला आहे.

प्राप्त माहिती नुसार तालुक्यातील हळदा, बोडधा, कुडेसावली, मुडझा, बलारपुर,आवळगाव, वांद्रा, चीचगाव सह अनेक गावे मोठया जंगला लगत वसलेले आहेत,तसेंच लागूनच शेजारी वैनगंगा नदी आहे.या गावच्या जंगलात  वाघ व बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठया प्रमाणात आहे. हे सर्व गावे कृषी प्रधान असून संपूर्ण शेती ही जंगल परिसरात व वैनगंगा नदीचे शेजारी आहे ,शेतकर्यांना  शेतीचे कामे करण्या करता जावेच लागते.त्या वेळात जंगलात व नदीचे परिसरात दबा धरून बसलेले वाघ शेतीचे कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवून त्यांना जिवंत मारतात .तसेच रात्रीच्या वेळात गावात प्रवेश करून जनावरे,शेळया इत्यादींना फस्त करण्याचे काम दाररोज सुरु आहे त्यामुळे हळदा सह इतर गावातील जनता भयभीत झालेली असून वाघापासून संरक्षण मिळणे करिता वारंवार वनविभाग यांच्याकडे पत्र व्यवहार सुरू आहे परंतु या सर्वं गावांना वाघा पासून संरक्षण मिळणे फारच कठीण झाले असून वारंवार हळदा येथील जनता वाघाचा बळी ठरत आहेत.

त्यातच 28 मार्च 2022 रोजी बोडधा येथील कवडू मेश्राम, एप्रिल महिन्यात आवळगाव येथील तुळशीराम कामडी यांचा बळी गेला .त्या नंतर 11 जून रोजी आवळगाव येथील क्षेत्रासहाय्यक करंडे यांच्या वर हल्ला झाला ते थोडक्यात बचावले,आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे  12 जून रोजी हळदा येथील  राजेंद्र अर्जुन कामडी व 14 जून 2022 रोजी त्याचं गावातील देविदास परशराम कामडी यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला तर त्यांचा सोबतचा शेतकरी थोडक्यात बचावला आणि यापूर्वी सुद्धा हळदा गावातील नानु राऊत गंभीर जखमी झाला होता.

तालुक्यातील जंगलव्याप्त अनेक गावांमध्ये मागील एक वर्षा पासून आता पर्यंत वाघांच्या हल्ल्यामुळे 18 ते 20 लोकांचा बळी गेला आहे.आणि सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने लोकांना आपल्या  शेतीच्या हंगामाची कामे पार पाडावी लागत आहेत.आणि अश्या परिस्थितीत त्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे, तसेच वाघांची दहशत आता जंगल सोडून गावा शेजारी दिसून येत आहे.या सर्व बाबींचा वनविभाग प्रशासनाने गांभीर्याने विचार करून सातत्याने हल्ले करणाऱ्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ विनोद झोडगे,महेंद्र ज्ञानवाडकर, हळदा येथील सरपंच दौलत गरमडे, उपसरपंच संजय लोणारे,ग्राम पंचायत सदक्ष धनराज लोणारे,प्रमोद भोयर, कालिदास इटनकर,ज्ञानेश्वर झरकर, मिनाक्षी गेडाम,रुपाली नखाते,सविता कामडी, लोमेश चदनखेडे,पितांबर म्हस्के,वांद्रा येथील रोशन नवघडे, लतीफ लोणारे, सचिन रामटेके,सुरेखा राऊत,सुनीता भाऊराव शेंडे उपस्थित होते.

राहुल भोयर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या