Advertisement

कन्हान येथे ‍शिवराज्यभिषेक सोहळा दिवस थाटात साजरा

कन्हान येथे ‍शिवराज्यभिषेक सोहळा दिवस थाटात साजरा

कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे शिवराज्याभिषेक सोहळा दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत शिवराज्याभिषेक सोहळा दिवस थाटात साजरा करण्यात आला .
सोमवार दिनांक ६ जुन ला शिवराज्याभिषेक सोहळा दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या हस्ते व मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत शिवराज्याभिषेक सोहळा दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सहसचिव प्रकाश कुर्वे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , वामन येवले , हरीओम प्रकाश नारायण , अनुराग महल्ले , कृणाल राजपुत , सह आदि मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .

रुषभ बावनकर, कन्हान-नागपुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या