Advertisement

शितला माता मंदीर कमेटी व्दारे १० व १२ वी च्या गुणवंताचा सत्कार कार्यक्रम थाटात संपन्न

शितला माता मंदीर कमेटी व्दारे १० व १२ वी च्या गुणवंताचा सत्कार कार्यक्रम थाटात संपन्न

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान  – स्थानिय धर्मराज विद्यालयातील इयता १२ वी च्या शालांत परिक्षेत कु जान्हवी भोंडे तालुक्यातुन प्रथम, इयता १० वीत बीकेसीपी शाळेची कु सुहासिनी शुक्ला ही सुध्दा तालुक्यातुन प्रथम आणि धर्मराज विद्यालयातुन आयुष सोनेकर प्रथम आल्याने या गुणवंत विद्यार्थ्यांचा शितला माता मंदीर कांद्री कन्हान व्दारे पुष्पगुच्छ, भेट वस्तु देऊन सत्कार करून पुढील वाट चालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळा व्दारे मार्च २०२२ मध्ये उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परिक्षा घेण्यात याल्या या उच्च माध्यमिक शालांत १२ वी परिक्षेचा (दि.८) जुन ला व माध्यमिक इयता १० वी चा (दि.१७) जुन ला निकाल घोषित करण्यात आला. यात कन्हान शहरातील धर्मराज विद्यालयाची कु  जान्हवी सेवकराम भोंडे हीने ९०.३३ % गुण प्राप्त करित विद्यालयातुन व पारशिवनी तालुक्यातुन प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झाली. माध्यमिक इयता १० वी मध्ये बीकेसीपी स्कुल कन्हान ची कु सुहासिनी शुक्ला हिने ९५.४०%, गुणाक्रमाने उत्तीर्ण होत शाळेतुन व तालु क्यातुन प्रथम क्रमाक पटकाविला. तसेच धर्मराज विद्यालयातुन इयत्ता १० वीत आयुष संजय सोनेकर ९० % गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम आल्याने या तिन्ही गुणवंत विद्यार्थ्याचा शितला माता मंदीर कमेटीचे डॉ अनिल मंगतानी, डॉ अमित मेश्राम, संजय चौकसे, ग्राप कांद्री सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, वामन देशमुख, धर्मराज विद्यालयाचे प्राचार्य श्री आर पी साखरकर, ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्य क्ष मोतीराम रहाटे, जिल्हा प्रतिनिधी कमलसिंह यादव, सदस्य ऋृषभ बावनकर आदि च्या हस्ते कु जान्हवी भोंडे, कु सुहासिनी शुक्ला, आयुष सोनेकर यांचा पुष्पगुच्छ, भेट वस्तु व मिठाई देऊन सत्कार करून पुढील उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शितला माता मंदीर कमेटीचे वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, महेंद्र मंगतानी, प्रितेस मेश्राम, ओमदास लाडे, वसंता राऊत , बादल विश्वकर्मा, सुरेश आंबागडे, प्रकाश ढोके सह नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या