नगर पंचायत च्या स्वछता अभिनयचे तीन तेरा: अभिषेक एकूणकर तालुका अध्यक्ष प्रहार विद्यार्थी संघटना पारशिवनी
पारशिवनी:- अलीकडेच झालेल्या पावसामुळे पारशिवनी ते खापरखेडा मेन रोड मार्केट परिसरात पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडताना दिसून येत आहे. तसेच दुकानांमध्ये ये-जा करताना व गाड्या ठेवतांना नागरिकांना त्रास होत आहे. पाणी रस्त्यावर साचून त्याची निकासी न झाल्याकारणाने ते पाणी एकाच ठिकाणी राहून त्याचे रूपांतर चिखलात होत आहे.
त्याचप्रमाणे रोडच्या बाजूला असलेल्या पार्किंग भागात हे पाणी आणि वर्दळीचा रस्ता असल्याकारणाने लोकांना रस्त्याच्या बाजूला वाहन उभे करताना विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहे व या कारणामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेन रोड च्या बाजूला नाली असून रस्त्यावर साचलेले पाणी हे नालीमध्ये जाण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही असे निष्पन्न झाले आहे.
पारशिवनी नगरपंचायत द्वारे स्वच्छता अभियान राबवले गेलेले आहे खुद्द पारशिवनी नगरपंचायत उदासीन दिसून असल्याचे निष्पन्न होत आहे ज्या अर्थी मेन रोड लगत असलेले मार्केट ठिकाण असून इथेच हाल आहे तर अन्य प्रभागात काय व्यवस्था असेल याची कल्पना आपण स्वतः करू शकता रिता या विषयावर तातडीने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन तातडीने योग्य ती कार्यवाही व्हावी


0 टिप्पण्या