तलावात आंघोळीला जाणे बितले जीवावर! बुडून मृत्यू
ब्रम्हपुरी – तालुक्यातील दुधवाही येथे तलावात बुडून मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना आज दिनांक ८ एप्रीलला दुपारी २.३० वाजता घडली आहे. मृतक मुलाचे नाव रितेश विजय धोटे वय वर्षे १२ असे असून दुधवाही येथील रहिवासी आहे . सविस्तर वृत्त असे , रितेश हा गावातीलच काही मित्रांसोबत गावालगत असलेल्या तलावात आंघोळ करण्यासाठी गेला होता .
आंघोळ करीत असताना तलावाच्या मध्यभागी रितेश हा पाण्याच्या खोल भागात गेला . आणि तलावाच्या पाण्यात लुप्त झाला . मित्रांनी रितेश ला खुप आवाज दिला मात्र पाण्याच्या बाहेर रितेश आला नाही . म्हणून मित्रांनी गावात पळत उठत धाव घेत गावातीलच काही लोकांना रितेश च्या मित्रांनी आपबिती सांगतली . लगेच गावातीलच काही लोकांनी तलावा कडे धाव घेत .
लगेच ही माहिती संबंधित पोलिस विभागाला गावातील लोकांनी दिली . रितेश चा शोध तलावाच्या पाण्यात घेतं रितेश चा मृतदेह बाहेर काढला व मृतदेह उत्तरीय तपासणी करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले . रितेश च्या पच्छात्य आई , बाबा , बहिण , आजी , असा आप्त परीवार आहे . रितेश हा कुटुंबाचा व गावातील सर्वांचा लाडका मुलगा होता .
रितेशच्या जाण्याने धोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून धोटे कुटुंब व गावापरिसर शोकसागरात बुडालेला आहे . घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत .
राहुल भोयर प्रतिनिधी


0 टिप्पण्या