Advertisement

बेलगाव नदी घाटावरुन मोठ्या प्रमाणात वाळुची चोरी

बेलगाव नदी घाटावरुन मोठ्या प्रमाणात वाळुची चोरी

राजकारण्यांची मुजोरी अधिकारी पाठराखण करी.

ब्रह्मपुरी वरून २२ किमी अंतरावरील ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव नदी घाटातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला. मात्र ब्रम्हपुरीतील महसूल व संबंधित अधिकारी आर्थिक व्यवहाराणे गुंग झालेत. नुकतेच काही महिन्यापासून बेलगाव येथील वाळू घाटांचा लिलाव झाला. घाट मालकाने वाळू उपसा सुरू केला मात्र चतुराईने जो गट लिलाव मध्ये आहे त्या गटामधून वाळूचा उपसा न करता दुसऱ्याच सोयीचे गटामधून वाळू उपसा करून दुसरा सोईचा रस्ता तयार करून मोठ्या प्रमाणात करोड रुपयांची वाळू चोरुन विकण्यात आली.

या चतुर घाट मालकाने नियमानुसार वाळूघाट उपसा करिता ताब्यात घेतला तेथुन आता वाळूचा उपसा सुरू केला. ही सत्यता प्रत्यक्ष बेलगाव नदी घाटावर जाऊन पाहणी केली असता वाळू उपसा सुरू असलेल्या नदीपात्रातून सात फुटा पेक्षाही अधिक खोल वाळू उपसा करून या घाट मालकाने नियमाचे उल्लंघन केले व करोडो रुपये किमतीची वाळू उपसा केली मात्र याकडे ब्रह्मपुरी येथील महसूल,व पोलिस, प्रशासन लाल, हिरव्या रुपयाच्या गुंगिने गुंग झाले आहेत.
अधिक माहिती मिळवली असता घाट मालकाचा मोठ्या पक्षाचा जवळीक संबंध असल्याने ब्रह्मपुरी येथील मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा व त्याच्या चमच्याच्या यात सहभाग असल्याचे कळते ब्रह्मपुरी येथील महसूल पोलिस प्रशासनाने तात्काळ याची दखल घ्यावी व आपले कर्तव्य पार पाडावे असी या परिसरातून मागणी होत आहे.

राहुल भोयर प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या