सी. सी रोड चोरीला गेला काय.?
रोड बांधकामाची चौकशी करा: गावकऱ्यांची मागणी
बांधकाम न करताच लावले फलक
ब्रम्हपुरी ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथे जन सुविधा योजने अंतर्गत महादेव मंदिर ते स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रेटीकरनाचे बांधकाम करण्यात आल्याचे फलक लावण्यात आले. मात्र बांधण्यात आलेला रस्ताच गायब झाल्याने रोड चोरीला तर नाही न गेला असे हास्यास्पद विधान रणमोचन गाव वासियात होतोय.
येथील सिसि रोड बांधकाम न करताच निधी उचल्याचा प्रकार घडल्याची तक्रार संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी यांच्याकडे केली आहे.
रणमोचन येथील सदर रस्ता बांधकामाला जिल्हा परिषद बांधकाम विभाग चंद्रपुर कडून जन सुविधा योजने अंतर्गत दहा लाख रुपये निधी दि. 14/05/2021 ला मंजूर असल्याचे लावलेल्या फलकावरून दिसून येते . झालेल्या बांधकामाचे बोर्ड लावण्यात आले मात्र सदर सिमेंट कॉन्क्रेटीकरनाचे बांधकाम अस्तित्वातच नाही . हि बाब उजेडात येताच काही दिवसांनी तेथील बोर्ड काढण्यात आले. यामुळे बांधकाम न करता निधी हडपल्याची चर्चाही गावात रंगू लागली . या प्रकाराची तक्रार करून योग्य चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून रणमोचन येथील ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी दोनाडकर, विलास मेश्राम, चंद्रलाल सहारे, लंकेश ठाकरे, माजी सरपंच मंगेश दोनाडकर,तारकेश्वर तोंडरे, सौरभ दोनाडकर व ग्रामवासियांनी केली आहे. याकडे रणमोचन वाशियांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी राहुल भोयर, ब्रम्हपुरी-चंद्रपूर


0 टिप्पण्या