स्थानिक आमदार व खासदार द्वारे! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दगावलेल्या परिवारातील विधवा महिला व वारसदारांना धनादेश देऊन केली आर्थिक मदत
कोरोनामुळे घरातील प्रमुखाच्या निधनाने राहणीमान खालावलेल्या परिवाराला धनादेश द्वारे आर्थिक मदत. दि. १२ मार्च २०२२ ला नगर परिषद,कन्हान येथे कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमध्ये कोविडमुळे घरातील कर्ता व्यक्तीच्या अचानक निधनाने वंचित परिवारातील विधवा महिला व वारसदारांना आर्थिक मदत म्हणून धनादेश वितरण केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, खूप मोठ्या प्रमाणात जीव हानी झाल्यानी खूपशे घर परिवार विस्कळीत झाले असता. त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करिता क्षेत्राचे आमदार व खासदार यांच्या हस्ते प्रमाण पत्र व धनादेश देऊन, मृतकांच्या परिवाराला अर्थसहाय्य केले.

कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले, कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्तीचा अचानक निधन झाल्याने परिवारासमोर मोठे दुःखाचे डोंगर व आर्थिक संकट निर्माण झाले, अश्या वंचित व गरीब परिवारातील विधवा महिलाना आर्थिक मदत देऊन मुलांचे शिक्षण व संसाराची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी सह्याद्री फौंडेशन च्या माध्यमातून रु. 30,000/- ची आर्थिक मदत देण्यात आली.
त्यामाध्यमातून आज दि. 12/03/2022 रोजी नागपूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील रामटेक एकूण 125 लाभार्थींना रामटेक लोकसभा खासदार मा. श्री. कृपालजी तुमाने यांचे हस्ते नगर परिषद कन्हान च्या सभागृहात लाभार्थीना आर्थिक मदतीचा धनादेश व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
रामटेक क्षेत्रातील कोरिनाच्याकाळात मृत्यू झालेल्या परिवाराच्या पाठीशी उभे असल्याचे मत खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले तसेच पीडित परिवाराला प्रशासनामार्फत आवशयक ती मदत करण्याचे आश्वासन आमदार ऍड आशिष जयस्वाल यांनी यावेळी बोलताना दिले व सह्याद्री फौंडेशन मार्फत रामटेक क्षेत्रातील लाभार्थीना आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला नागपूर सुधार प्रण्यास चे विश्वस्त श्री. संदीप इटकेलवर, श्री. वर्धराज पिल्ले, सामाजिक कार्यकर्ते, श्रीमती.करुणा आष्टनकर, श्री. गोविंद पोद्दार, श्री. विजय क्षिरसागर, अध्यक्ष, सह्याद्री फौंडेशन, नगरसेविका सुषमा चोपकर, संगीता खोब्रागडे, अनिता पाटील, मोनिका पौणिकर, कल्पना नितनवरे, वंदना करडकर, चिंटू वाकुडकर हे प्रामुख्याने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे यशस्वीते करिता सह्याद्री फौंडेशनचे श्रद्धा चिलकलवार, अक्षय चव्हाण, प्रज्वल मुके, नयन पाटील, कुणाल शाहू यांनी परिश्रम घेतले.
यावेळी खासदार मा. कृपालजी तुमाने,(रामटेक लोकसभा )
आमदार मा.आशिष जयस्वाल (रामटेक विधानसभा)
शिवसेना जिल्हाप्रमुख (नागपूर) श्री. संदीप इटकेलवार,
शिवसेना उपजिल्हा प्रमुख (नागपूर-ग्रामीण) श्री. वर्धराज पिल्ले
कन्हान नगर परिषद अध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष श्री. डॅनिअल शेंडे, नगरसेवक श्री अनिल ठाकरे, श्री. राजेंद्र शेंदरे, राजेश यादव, नगरसेविका मोनिका पौनिकार, सुष्मा चोपकर, समशेर पुरवले,चिंटू वाकुडकर, अर्जुन पात्रे व इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.


0 टिप्पण्या