कन्हान शहर मधील मोठी बातमी! जुन्या डिजे वाजविण्याचा कारणा वरुन चार आरोपी ने युवकास चाकुने मारून केले गंभीर जख्मी
फिर्यादी च्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस एक किलो मीटर अंतरावरील पांधन रोड ओम बुक डेपो जवळ चार आरोपी ने जुन्या डिजे वाजविण्याचा कारणावरून युवकास चाकुने मारून गंभीर दुखापत करित गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून चार ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक ११ मार्च ला रात्री ८४५ ते ९१५ वाजता दरम्यान रितीक नेपाल गजभिये वय २३ वर्ष राहणार वार्ड क्रमांक १ गोंडेगाव हा टाटा एस चारचाकी गाडी क्रमांक एम एच ४० बी एल ८५९१ ने भरगच्छ लोकवस्ती मधिल पांधन रोडवरील ओम बुक डेपो जवळ उभी केली असता आरोपी १) गज्जु व त्या सोबत अन्य तीन आरोपी हे स्पेलंडर दुचाकी वाहनाने येवुन जुन्या डिजे वाजविण्याचा कारणावरून चार आरोपीतांनी संगमत करून यहा है ओ म्हणत अश्लिल भाषेत शिवीगाळ करित आरोपीतांनी स्वतहा जवळी ल चाकुने रितीक नेपाल गजभिये याच्या पुठ्ठ्यावर (ढुगणावर), डोक्याचा मध्य भागी व नाकावर चाकुने मारून गंभीर दुखापत करित जख्मी केले .
सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन जख्मी युवकाला प्रथमोपचारास प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे नेले असता डाॅक्टरांनी तपासुन प्रकृती गंभीर असल्याने नागपुर शासकीय रुग्णालयात रवाना केले. कन्हान पोलीसांनी घटनास्थळा चा पंचनामा करून फिर्यादी रितीक गजभिये यांच्या तोंडी तक्रारी वरून आरोपी गज्जु व इतर तीन असे चार आरोपी विरुद्ध कलम ३०७, २९४ , ३४, ४, २५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान व कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस उपनिरीक्षक सतिश मेश्राम हे करीत आहे.
नुकताच कन्हान मध्ये गुन्हेगारी, अवैध धंदे , इत्यादी विषयावर शिवसेना च्या शिष्ट मंडळाने मा. dysp बागुल, यांच्याशी सव्वाद साधून कन्हान शहर ची वस्तुस्तिथी काय आहे समजून सांगितली होती. व कन्हान शहर च्या नगर अध्यक्षा यांना सुद्धा असल्या संबंधित बाबींना समोर जाव लागल होते, लगेच आणखी ही घटना घडली. जेव्हा कन्हान शहर चे प्रथम नागरिक सुरक्षित नाही तर कन्हान मधील व जवळपासची जनता कशी सुरक्षित राहणार, मोठा प्रश्न जन्त्येच्या मधून तोंड वर काढतांनी दिसत्य.
प्रतिनिधि-ॠषभ बावनकर,कन्हान-नागपूर


0 टिप्पण्या