Advertisement

सुरगाणा नगराध्यक्ष पदासाठी कानडे-वाघमारे यांच्यात चुरस, माकप व तटस्थ राहण्याची शक्यता

सुरगाणा नगराध्यक्ष पदासाठी कानडे-वाघमारे यांच्यात चुरस, माकप व तटस्थ राहण्याची शक्यता

सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून विजय कानडे तर शिवसेनेकडून भारत वाघमारे या दोघांचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण निघाल्याणानंतर भाजपकडून सचिन महाले व विजय कानडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र विजय कानडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून त्यांना सुचक म्हणून नगरसेविका मालतीबाई खांडवी तर अनुमोदक नगरसेविका जानकीबाई देशमुख आहेत. शिवसेनेकडून भारत वाघमारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

त्यांना सुचक म्हणून नगरसेवक सचिन आहेर तर अनुमोदक नगरसेवक भगवान आहेर आहेत. हे दोन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी वैध ठरवले आहेत.

यावेळी तहसिलदार सचिन मुळीक हे उपस्थित होते. विजय कानडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, समीर चव्हाण यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तर भारत वाघमारे यांचा अर्ज दाखल करतेवेळी तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे, गटनेता सचिन आहेर, नगरसेवक भगवान आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी: किशोर जाधव, सुरगाणा-नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या