कन्हान परिसरात आधुनिक सुसज्जित मोक्षधाम ची निर्मिती करणे करिती निवेदन: प्रशांत मसार
कन्हान-पिपरी नगर परिषद तालुक्यातील मोठी नगर परिषद असून कन्हान शहर मध्ये मोक्षधाम नाही. ह्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते यांनी, लवकरात लवकर कन्हान शहर मध्ये लवकरात लवकर अंतिमसंस्कार दहन घाट बांधकाम करण्यात यावा.
कन्हान-पिपरी ग्रामपंचायत चे नगर परिषद मध्ये रुपांतर झाले ती देखील कन्हान नप अंतर्गत सुविधेचा अभाव आहे. कधी पूर्ण होणार सुविधा इत्यादी प्रश्न जनते समोर निर्मान होत आहे. मृतक च्या परीजानांना त्रास सहन करावा लागत आहे. कन्हान नगर परिषद ची जनसंख्या 50 हजाराच्या वर असून कन्हान शहर आधुनिक सुविधेपास्न विलुप्त आहे, असे सांगितले जात आहे.
मोक्षधाम हा कन्हान नदी च्या काठी करावी अशी मागणी देखील ह्यावेळेस समाजसेवक करतांना दिसत आहे. मोक्षधाम करिता 4 दहन शेड, दोन शोकसभा हॉल, पिण्याच्या पाण्याची टाकी, सभोवतालच्या परिसरात ग्रेनैड,झाडे,वृक्ष रोपण करून सौदर्य करण्यात यावे.
निवेदन: सुनील केदार (मंत्री महाराष्ट्र राज्य), कृपाल तुमाने (खासदार रामटेक लोकसभा),आशिष जैस्वाल (आमदार रामटेक विधानसभा ), रश्मी बर्वे (अध्यक्षा जिल्हा परिषद-नागपूर) करुणा आष्टनकर (नगराध्यक्ष कन्हान-पिपरी), मुख्याधिकारी-कन्हान पिपरी नगर परिषद,जोगेंद्र रंगारी (मा.उपाध्यक्ष कन्हान-पिपरी नगर परिषद)


0 टिप्पण्या