ब्रम्हपुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा जाहीर निषेध
विरोधात जोरदार घोषणाबाजी
ब्रम्हपुरी :- महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने दाऊद इब्राहिमच्या भावाशी मालमत्ता खरेदीचा व्यवहार केल्याच्या आरोपावरून पहाटे ५ वाजता घरातून ताब्यात घेऊन तपासणी व चौकशीचे नाटक रंगवून तुरुंगात डांबण्यात आलेल्या कारवाईबाबत आक्रोश करत राष्ट्रवादी काँग्रेस , काँगेस पक्ष व शिवसेना या तिन्ही पक्षाकडून जाहीर निषेध आणि धिक्कार करण्यात आला.
तशा आषयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी मार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अतिशय स्पष्टपणे कुणालाही न घाबरता केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा समाचार घेणारे नवाब मलिक यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्रास देण्याचा व महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे.
सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरणाऱ्या केंद्र सरकारची ही दहशत निर्माण करण्यासाठी केलेली कारवाई आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळणारे अपयश आणि केंद्रातल्या कारभारामुळे जगभरात होणारी नाचक्की यास नवाब मलिक केंद्राला वारंवार लक्ष्य करणे हीच या अटके मागील खरी कारणे आहेत.
विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी उचललेले हे दहशत निर्माण करणारे पाऊल आहे. नवाब मलिक यांच्या अटकेचा आम्ही जाहीर निषेध करतो.दहशत निर्माण करणाऱ्या ईडी चा दुरूपयोग करणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत. अशा आषयाचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.
निवेदन देतेवेळी वासूभाऊ सोंदरकर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष ब्रह्मपुरी, जगदीश पिलारे विधानसभा अध्यक्ष ब्रह्मपुरी, कृपाली मेश्राम सचिव राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश, अश्विन उपासे,तुळशीरामजी काढलाम, दुधराम ठाकरे, युवराज पारधी अतुल राऊत , विनोद दोनाडकर, राहुल भोयर,अश्विनी भनारे, प्रिया मोटघरे व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी:-राहूल भोयर


0 टिप्पण्या