विधान परिषद सदस्य आमदार
डॉ.सुधीर तांबे यांच्या निधीतून आदिवासी दुर्गम भागातील शाळांमध्ये संगणक संच वाटप.
सुरगाणा ता.२/२/२०२२:
विधान परिषद सदस्य आमदार डॉ.सुधीर तांबे नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ यांच्या निधीतून आदिवासी दुर्गम भागातील शाळांना संगणक संचाचे वाटप करण्यात आले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावी त्याप्रमाणे संगणकाची आवड निर्माण झाली पाहिजे या उद्देशाने अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा शाळा मनखेड, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शाळा आंबुपाडा बेडसे, आदि जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आमदार पळसन, गिरजा देवी माध्यमिक आश्रमशाळा शिंदे दिगर, डी.टी.जायभावे माध्यमिक विद्यालय घागबारी, माध्यमिक आश्रमशाळा हतगड , अनुदानित आश्रमशाळा चिंचला, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगुण या शाळांना संगणक संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक नसिर मणियार, श्रीमती अर्चना जगताप, निर्मला बागुल, कापडणीस, अहिरे, घुगे, नाठे, महाले, वाकचौरे,रतन चौधरी, भास्कर बागुल, सुरेश चौधरी, समन्वयक वसंत राठोड आदी उपस्थित होते.
फोटो- सुरगाणा येथे संगणक संचाचे वाटप करतांना समन्वयक वसंत राठोड,



0 टिप्पण्या