Advertisement

ब्रम्हपुरी तालुका अखिल सुतार समाजाचे स्नेहसंम्मेलन व शिवजयंती साजरी

ब्रम्हपुरी तालुका अखिल सुतार समाजाचे स्नेहसंम्मेलन व शिवजयंती साजरी

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुका अखिल सुतार समाजाचे स्नेहसंम्मेलन व शिवजयंती सोहळा स्थानिक दुर्गा मंगल कार्यालय ब्रम्हपुरी येथे नुकतेच पार पडले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं.बोरगावच्या सरपंच मेघाताई कवळुजी पिंपळकर, उद्घाटक म्हणुन उपकार्यकारी अभियंता म.रं.विज वितरण कं. गडचिरोलीचे नरेश बुरडकर तर प्रमुख अतिथी म्हणुन गडचिरोलिचे ग्रामविकास अधिकारी दिगांबरजी लाटेलवार, स्टेट बँक ब्रम्हपुरीचे मंगेश वांढरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रभु विश्वकर्मा यांच्या प्रतिमेच्या पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिगांबरजी लाटेलवार यांनी व्यसनमुक्ती व समाजाची दिशा व दशा या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यासोबतच अन्य मान्यवरांनी सुद्धा आपले मत प्रगट केले.व समाजाच्या हितासाठी आवश्यक गोष्टिंवर चर्चा केली.

तसेच कार्यक्रमाच्या निमित्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मान्यवरांच्या उपस्थितित समाजाच्या वतिने साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तालुका सुतार मंडळाचे अध्यक्ष हरिदासजी पोटेकर,सचिव गुरुदेव वांढरे ,विजय शास्त्रकार,रामु झिलपे,रघुविर रासेकर,संतोष दहिकर,वसंता साखरकर यांचे अथक परिश्रम लाभले.
कार्यक्रमाचे संचालन गायत्री हेमराज रासेकर यांनी तर आभारप्रदर्शन मनोहर कोरानकर यांनी केले.कार्यक्रमाला समाजातील बहुसंख्य मंडळी उपस्थित होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या