बिल्डर दिवाकर निकुरे याला ६ % व्याजदराने रक्कम देण्याचे ब्रम्हपुरी न्यायालयाचे आदेश
ब्रम्हपुरी : प्लॉटधारकाची फसवणूक केल्या प्रकरणी येथील बिल्डर दिवाकर निकुरे याला प्लॉटधारकास ६% व्याजदराने दिवाणी मामला दाखल केल्यापासून ते वसुली होईपर्यंत गुंतवणूक केलेल्या रकमेवर देण्याचे आदेश ब्रम्हपुरी येथील दिवाणी न्यायालयाने दिले आहे. बिल्डर दिवाकर निकुरे याच्या कडून येथील पत्रकार नितीन येनुरकर यांनी फेब्रुवारी २०१३ मध्ये दोन प्लॉट चा सौदा केला होता.
यावेळी बयानादाखल ३ लक्ष रुपये दिले होते. सन २०१५ ला ब्रम्हपुरी नगर परिषद अंतर्गत गुंठेवारी कायद्याचा गैरवापर करून काही इसमानी फौजदारी स्वरूपाचे कृत्य केले. ह्यातच बिल्डर दिवाकर निकुरे याने सौद्यातील प्लॉट ची मिळकत बेकायदेशीररित्या गुंठेवारी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावरून फौजदारी गुन्हे नोंद झाल्यावर बिल्डर दिवाकर निकुरे यास आरोपी करण्यात आले.
बिल्डर दिवाकर निकुरे याने येथील पत्रकार नितीन येनुरकर यांच्याकडून बयानाची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून पत्रकार नितीन येनुरकर यांनी दिवाणी न्यायालय ब्रम्हपुरी येथे बिल्डर दिवाकर निकुरे याच्या विरुद्ध रक्कम वसूलिकरिता दि. वा. क्र. ०७/२०१६ दाखल केला. याबाबत येथील दिवाणी न्यायालयाने निर्णय पारित केला असून बयाना दाखल दिलेली रक्कम दिवाणी मामला दाखल झालेल्या तारखेपासून ते वसुली मिळेपर्यंत ६% व्याजासह पत्रकार नितीन येनुरकर यांना देण्याचे आदेश न्यायालयाने पारित केले आहे. वादी पत्रकार नितीन येनूरकर तर्फे अँड. साजन निमजे यांनी काम बघितले.


0 टिप्पण्या