Advertisement

अनेकांचे बळी घेणा-या त्या मुन्नाभाईला १४ दिवसाची मॅजेस्टिक कष्टडी

अनेकांचे बळी घेणा-या त्या मुन्नाभाईला १४ दिवसाची मॅजेस्टिक कष्टडी

धसई शासकिय दवाखान्यातून  शिपाई पदावरुन सेवानिवृत्त होऊन , स्वःताला डाॅक्टर म्हणून घेत गोरगरबांच्या जिवाशी खेळ मांडलेल्या  धसई येथील बोगस डाॅक्टर (मुन्नाभाई) पांडुरंग दगडू घोलप याला तीन दिवसांच्या पोलीस कष्टडी नंतर सोमवार दिनांक 31 रोजी दिवाणी न्यायाधीश मुरबाड यांनी 14 दिवसाची मॅजेस्टिक कष्टडी सुनावल्याने त्याला आधारवाडी जेल कल्याण येथे रवाना केले. हा झटका तालुक्यातील अनेक मुन्नाभाई दवाखाने बंद करून गायब झाले आहेत

कोणत्याही सरकारी सेवकाची तीन वर्षात अन्यञ बदली होत असते. माञ धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षानूवर्षे एकाच ठिकाणी शिपाई म्हणून सेवानिवृत्त त्याच ठिकाणी झाला. सेवेत असतांना पांडुरंग घोलप हा स्वःताला डाॅक्टर म्हणून घेत गोरगरीबावर उपचार करतांना रुग्णाला इंजेक्शन देत असे.

माञ दिनांक 24 व 26 जानेवारी या दरम्यान रुग्णावर उपचार करतांना त्यांना दिलेल्या इंजेक्शनचे दुष्परिणाम होऊन पाच जण दगावले . याची माहीती धसई वैद्यकिय अधिकारी डाॅ.उमेश विठ्ठल वाघमोडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.भारती बोटे यांच्या आदेशाने टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर सर्व यंञणा खडबडून जागी होऊन चौकशीला लागली.

टोकावडे पोलिसांनी 29  जानेवारी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती . ती आज दिनांक 31 जानेवारीला संपताच घोलप याला मुरबाड न्यायालयात हजर केले असता , न्यायालयाने त्याला 14 दिवसाची मॅजेस्टिक कोठडी सुनावल्यानंतर बोगस डाॅक्टर घोलप याची रवानगी कल्याण येथील आधारवाडी जेल मध्ये करण्यात आली.

या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांनी हाती घेतल्याने डुप्लिकेट औषध , ंइंजेक्शन , विकणारे व इतर बोगस डाॅक्टरांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत आमदार किसन कथोरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ठाणे जिल्ह्यात जेवढे बोगस डॉक्टर आहेत त्यांच्या वर कार्यवाई होणार.

प्रतिनिधी: राजेश भांगे मुरबाड-ठाणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या