Advertisement

मुरबाड शिवसेनेला "राम" चा रामराम! राम आता भाजप च्या पायवाट्यावर

मुरबाड शिवसेनेला “राम” चा रामराम! राम आता भाजप च्या पायवाट्यावर  

मुरबाडच्या शिवसेनेत “राम” राहिला नाही

मुरबाड नगर पंचायत निवडणूकीच्या अर्ज भरण्याच्या अखेर दिवस  राम ने शिवसेनेला  जय महाराष्ट्र करीत भाजपात दाखल होत नगरसेवक पदाची उमेदवारी घेतली.

मुरबाड शिवसेना म्हणजे बंडखोरीचा शाप , ज्यांनी शिवसेना वाढवण्यात आयुष्य खर्ची घातले त्यांना वा-यावर सोडून सतरा पक्ष बदलून आलेल्यांना तालुका प्रमुख, शहर प्रमुख पदासह महत्वाच्या जबाबदा-या दिल्या . परंतू याचा फटका शिवसेनेला बसत संघटना अंतर्गत वादात खिळखिळी झाली . मुरबाड  नगर पंचायत निवडणूक ऐन रंगात आली असतांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहर प्रमुख राम दुधाळे यांनी पक्षनेतृत्वाला थांगपत्ता लागू न देता भाजपाकडून उमेदवारी अर्ज  दाखल केल्याने शिवसेनेची पंचायत करुन ठेवली . मुरबाड  शहर शाखा म्हणजे विना चालकाचे वाहन झाल्याने नगर पंचायत निवडणूकीवर याचा विपरीत परिणाम होणार आहे.आणि नगराध्यक्ष पदाची स्वप्न बघणा-या शिवसेनेला दोन चार नगरसेवक निवडून आणून पक्षाची उरलीसुरली वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे . या सर्व घडामोडीस तालुका नेतृत्व असल्याचा आरोप जुन्या शिवसैनिकाकडून  केला जात असून पक्षाने वेळी दखल घेतली नाही तर तालुक्यातील पक्षाच्या अस्तित्वाला कायमचा धक्का बसणार आहे.

राम दुधाळे राजकीय प्रवास
1989-शिवसेना
1990- समाजवादी
1991 -काँग्रेस
1992- आगरी सेना
1993- शिवसेना
1994- शेकपा
1995- शिवसेना
1996- गणेश नाईक शिवशक्ती
1999 – काँग्रेस
2000- भाजप
2004 – राष्ट्रवादी काँग्रेस
2006-शिवसेना
2009-मनसे
2010- राष्ट्रवादी काँग्रेस
2012- भाजपा
2013- राष्ट्रवादी काँग्रेस
2014-भाजपा
2015 शिवसेना
2021- भाजपा

आताच्या घडीला भाजपा किती दिवसासाठी! असा प्रश्न शिवसेना कार्यकर्त्यात निर्माण होत आहे.

प्रतिनिधी-राजेश भांगे,मुरबाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या