वंचित बहुजन आघाडी कन्हान तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६५ व्या महापारीनिर्वान दिनी विनम्र अभिवादन
वंचित बहुजन आघाडी कन्हान संविधानाचे शिल्पकार, क्रांतिसूर्य, महामानव, विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65व्या महानिर्वाण दिन गहुहिवरा चौक, आनंद नगर,कन्हान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम यांनी माल्यार्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शेवटचा क्षणावर प्रकाश टाकला, आणी दगडाचं ह्रदय असणाऱ्याला सुद्धा रड फुटणार इतका मोठा संघर्ष आयुष्यात बाबासाहेब यांनी एकट्याने घेतला संपूर्ण शोषितानचं उद्धार केलं. देशाला संविधान दिलं सह माहिती दिली.
सायंकाळी दिप प्रजलीत करून संपूर्ण गहुहिवरा चौक परिसर प्रकाशमय करण्यात आलला. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी कन्हान-शहर कार्यकारणी उपस्थित विधानसभा उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले, शैलेश ढोके (सचिव), सुशील कळमकर, अशोक नारनवरे, सोनू खोब्रागडे, मनिष शंभरकर, विजय बहादुरे, बाळू नागदेवे, सचिन मेश्राम, विक्रम सोमकुवर, लालचंद राऊत, मनोज गोंडणे, सोनू पवनीकर, विनोद चिंमणकर, संदीप गजभिये, लांजेवार इत्यादी अनेक कार्यकर्ते आवर्जून प्रामुख्यानी उपस्थित होते.


0 टिप्पण्या