कन्हान-पिपरी नप येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.हैदरी सर्वत जहरा यांची नियुक्ती
डॉ.हैदरी सर्वत जहरा वैद्यकीय अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
ना.सुनील केदार मंत्री (म.राज्य) रश्मी बर्वे जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे ह्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार यांनी मानले आभार
कन्हान पिपरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील कित्येक महिन्यांपासून महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती झाली नसून महिलांना आरोग्य संबंधित मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. याकरिता महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार यांच्या नेतृत्वात माननीय नामदार सुनीलजी केदार मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे यांना निवेदन देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली होती.
त्यांनी ही मागणी कन्हान पिपरी शहरातील व आजूबाजूच्या ग्रामीण क्षेत्रातील महिलांना वैद्यकीय महिला अधिकारी नसल्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा करावा लागत असल्याने लक्षात येता. तात्काळ कन्हान पिपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. हैदरी सर्वत जोहरा वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार, पंकज गजभिये, दिपक तिवाडे, अशोक मेश्राम, विजय बावनकुळे, कुंदन रामगुंडे, रामू कावळे, अभिषेक आकरे ,माधुरी गावंडे, वर्षा रामगुंडे, शालू कावळे, कल्पना खंदारे, उषा ठाकरे, विमल आकरे, मीना पहाडे, रामकली वानखेडे आदी उपस्थितांनी महिला वैद्यकीय अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच मंत्री मा.ना. सुनील केदार व रश्मी बर्वे जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आभार मानले.


0 टिप्पण्या