Advertisement

आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आपलं गाव स्वच्छ तर आपला देश स्वच्छ ह्या मोहिमेतून कशाळगाव येथे डजबीनचे वाटप

आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आपलं गाव स्वच्छ तर आपला देश स्वच्छ ह्या मोहिमेतून कशाळगाव येथे डजबीनचे वाटप.

वडगाव मावळ कशाला गाव येथील नवरात्र उत्सवानिमित्त व स्वयंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष   मा.सरपंच  दत्तात्रय पडवळ यांच्या प्रेरणेतून   येथे टी-शर्टचे  व स्वच्छतेसाठी डजबीन वाटप करण्यात आले.यावेळी पडवळ म्हणाले आपलं गाव स्वच्छ राहीले तर  आपला देश  स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. हया हेतुने  डजबीन वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.तसेच आपल्या आजुबाजुला कचरा न टाकता तो कचरा डजबिनमध्ये टाकुया  जेणे करुन कचर्‍याची  योग्य विल्हेवाट होईल व आपल्या आवती भोवतीच्या निसर्गाचा र्‍हास होणार नाही.असे पडवळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सरपंच विठ्ठल जाधव यांनी  दत्तात्रय पडवळ यांचे कौतुक केले. जो उपक्रम हाती घेतला आहे त्याउपक्रमातुन संपूर्ण मावळ तालुका कचरा मुक्त होईल व त्यानिमित्त मावळचे आमदार सुनिल शेळके यांना वाढदिवसाच्या नक्कीच शुभेच्छा मिळतील अशी भावना व्यक्त केली.

यावेळी माजी सरपंच विठ्ठल जाधव,आदर्श सरपंच शरद जाधव,उपसरपंच तुकाराम जाधव,सरपंच भाऊ गवारी,उपसरपंच योगेश मदगे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवनाथ जाधव, श्री मळुबाई प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत जाधव, उपाध्यक्ष शंकर जाधव, कार्याध्यक्ष नरेश जाधव,खजिंनदार राहुल जाधव,शालेय व्यवस्थान समितीचे उपाध्यक्ष रामकृष्ण जाधव,, रा.कॉं.सोशल.मिडियाचे उपाध्यक्ष मंगेश जाधव,अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस रामदास जाधव, रा.कॉं.सोशल मिडीया सरचिटनीस शंकर मोढवे,आंदर मावळ अध्यक्ष वैभव पिंगळे, दिपक मदगे, काळुराम जाधव,भाऊ सुतार,शाम पवार सोन्या पवार, पंकज पडवळ,अक्षय अड़ीवळे,आकाश जांभुळकर,सुग्रीव चव्हाण,सुरेश जगताप,किरण जाधव,रूपेश जाधव,तानाजी शिंदे,ऋषिकेश जाधव,गणेश जाधव,चेतन जाधव,विनोद जाधव,बाळासाहेब जगताप,बाळासाहेब जाधव,नितिन जगताप, मारुती जाधव,विष्णु जाधव,दासु शिंदे,गबळु जाधव,गोमाजी जगताप, नितिन जाधव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  तुकाराम जाधव कार्यक्रमाचे आभार प्रशांत जाधव यांनी केले.

प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या