कशाळगावच्या शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माजी आदर्श सरपंच शरद जाधव तर उपाध्यक्षपदी रामकृष्ण जाधव यांची निवड
वडगाव मावळ :-वडगाव मावळ कशाळगावच्या शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचा कार्य काळ संपत आल्यामुळे आज विद्यार्थ्यांचे पालकांना निमंत्रित करण्यात आले या बैठकीत सर्वानुमते कशाळ गावचे माजी आदर्श सरपंच शरद बबन जाधव यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच कशाळगावचे माजी पोलीस पाटील यांचे पुत्र रामकृष्ण बारकु जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच सदस्यपदी दिलीप जाधव,काळुराम जाधव,वंदना संजय जाधव,वंदना सोमनाथ सुतार,अनिता महेंद्र जाधव,नाजुका भाऊसो जाधव

यांची निवड करण्यात आली.नवनिर्वाचित अध्यक्ष शरद जाधव यांनी कोविढ १९ च्या दीड वर्षात झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान पुढील काळात दुर केले जाईल असे सांगितले.
यावेळी माजी सरपंच विठ्ठल जाधव,शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीची माजी अध्यक्ष अशोक जाधव, रामदास जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ जाधव, माजी उपसरपंच तुकाराम जाधव,रघुनाथ जगताप,बाळासाहेब जाधव, नरेश जाधव, शंकर जाधव, मंगेश जाधव, प्रशांत जाधव,रामदास जगताप,बारकु जाधव, दत्तात्रय जाधव,गौतम जाधव, अक्षय जाधव, मुरलीधर सुतार, सुमित सोनवणे, सोमनाथ सुतार,सुरेश जगताप, संजय जाधव, बजरंग जाधव आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)



0 टिप्पण्या