Advertisement

श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचे जन्मगाव साते येथे नामकरण फलकाचे वीर मानकोजी पायगुडे यांचे वंशज राजकुमार पायगुडे यांच्या हस्ते उद्धाटन

श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचे जन्मगाव साते येथे नामकरण फलकाचे वीर मानकोजी पायगुडे यांचे वंशज राजकुमार पायगुडे यांच्या हस्ते उद्धाटन

वडगाव मावळ (पुणे):- विजयादशमीनिमित्त साते गावात श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे स्मारक समिती तसेच साते गावातील नागरीक यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचे जन्मस्थळ साते-मावळ ह्या ठिकाणी नामकरण फलकाचे उद्धाटन अटकेपार झेंडा रोवनारे वीर मानकोजी पायगुडे यांचे वंशज राजकुमार पायगुडे यांच्या हस्ते साते फाटा येथे करण्यात आले.
पुढील काळात गावातील प्रवेशद्वार तसेच स्मारक उभारणार असल्याचे इतिहासप्रेमी श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा.मोहनजी शेटे यांनी सांगीतले.
यावेळी श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे स्मारक समितीचे सर्व सदस्य तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.

प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या