मुरबाड मधील जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी घरी आराम करावे, तालुका प्रमुखांचा जुन्या शिवसैनिकांना सल्ला समजावे की धमकी ?
ठाणे जिल्हा पथीषद अध्थक्ष सुभाष पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केल्याने मुरबाड तालुकयात कोमात असलेली शिवसेना जोमात आली खरी परंतू यामुळे जुने शिवसैनिक आणि नवे शिवसैनिक हा वाद सुरु झाला आहे . या वादावर पडदा पडावा व सर्वांनी एकञ येऊन संघटनेचे काम करावे म्हणून जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी जुन्या शिवसैनिकांना भेटीस बोलावल्यावर केशव गडगे , राजेश भांगे , राम सासे , अशोक केदार विनायक ढमणे , निलेश चौधरी , मिलींद घरत , जगन माळी.मेघराज वेखा॑डे. असे अनेक शिवसैनिक प्रकाश पाटील यांना भेटल्याचे समजताच तालुका प्रमुख कांतिलाल कंटे , यांनी केशव गडगे यांना फोन करुन तुम्ही जिल्हा प्रमुखांना का भेटलात. आता तुम्ही आराम करा आम्ही नव्याना संधी देणार आहोत. तालुका प्रमुखांच्या या सल्ल्याने जुन्या शिवसैनिकात संतापाची लाट पसरली असून तालुका प्रमुख कांतिलाल कंटे यांना पदावरुन दूर करावे. जुन्या सैनिकांना न्याय मिळावा यासाठी थोड्याच दिवसात स्वर्गिय आनंद दिघे यांच्या समाधी समोर धरणे आंदोलन करणार आहेत.
शिवसैनिक. केशव गडगे यांना कांतिलाल कंटे यांनी सांगितले कि आता जुन्या शिवसैनिकांचे काम राहिले नसून तुम्ही घरीच बसा यांवर केशव गडगे म्हाणाले चाळीस वर्षे आम्ही शिवसेना मध्ये काम केले आम्ही कोणत्याही पदांची अपेक्षा केली नाही. तुम्ही घरी बसा कसे म्हणता. यावरुन मुरबाड मधील शिवसैनिक भडकले असून ते लवकरच निर्णय घेणार आहेत.
प्रतिनिधी राजेश भांगे, मुरबाड



0 टिप्पण्या