Advertisement

लाचलुचपत विभागातर्फे दक्षता जनजागृती कार्यशाळा पारशिवनी मध्ये संपन्न

लाचलुचपत विभागातर्फे दक्षता जनजागृती कार्यशाळा पारशिवनी मध्ये संपन्न

पारशिवनी तालुक्यात दि. २९/१०/२०२१ ला पोलीस स्टेशन पारशिवनी च्या वतिनी विशेष जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे (anti-corruption bureau) विशेष दक्षता जनजागृती कार्यशाळा मोहीम राबविण्यात आली. दक्षता कार्यशाळेचे उद्देश्य महिलांना जागृत करून वरिष्ठ नागरिकांना माहिती सादर करणे होते.

दक्षता जनजागृती कार्यशाळेत अनामिका मिर्झापुरे (DYSP,नागपूर) यांच्या द्वारे भ्रष्टाचार संबंधित तक्रार कशी करावी.  तसे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याबद्दल सवीस्तर माहिती सांगून, लोकांचे विषय / प्रश्न मोकळे करण्याचा प्रयत्न ह्या वेळेस करण्यात आले. लाच घेणे किंवा लाच देणे हा दंडनीय अपराध आहे  ह्या संबंधित माहिती सादर करण्यात आली. जर नागरिकांची फसवणूक होत असेल किवा प्रशासकीय अधिकारी लाच घेत असेल तर संबंधित तक्रार टोलफ्री क्रमांक १०६४  ह्या क्रमांक आपल्या मोबाईल वरून डायल करून तक्रार नोंदवू शकता सविस्तर माहिती ह्यावेळेस सादर करण्यात आली.

जनतेच्या समस्या कश्या प्रकारे समाधान कारक असतील, शासकीय व प्रशासकीय विभागात होणारी समस्या  कश्या प्रकारे सुधारणा होऊ शकते, त्यासाठी साधारण जनतेने कश्या प्रकारे प्रयत्नशील राहावे? या बाबाद पुढाकार समाचार च्या प्रतिनिधी प्रा. निता ईटनकर व सहकारी रक्षणा गजभिये  यांनी विभागाला व विभागातील वरिष्ट अधिकार्न्याना प्रश्न केले असता, लाचलुचपत संबंधित मधिती नागरिकांना समजण्यात व संबंधित अधिकार्यांना समजवण्यात मदत झाली व नागरिकांना समजायल सोपे झाले. ह्या वेळेस प्रामुख्यानी उपस्तीथ पारशिवनीतील ज्येष्ठ नागरिक श्री मोरेश्वर फुलबांधे, गजानन लोणारे, भगवान बोकडे, प्रल्हाद अकोने ,शेषराव काकडे , अर्षद शेख,  विठोबा ढोबळे, नगर अध्यक्षा प्रतिभा कुंभलकर, रक्षणा गजभिये, वंदना भुरे, प्रा.निता ईटनकर, सीमा कळमकर, अनिता भंड, नलिनी भुजाडे, उपस्तीथ होते.

लाचलुचपत विभागातर्फे सहा-पोलीस निरीक्षक विनायक गागुलवार, ज्ञानेस्वर  चिमूरकर, यांच्या प्रमुख उपस्तीथित दक्षता कार्यशाळा घेण्यात आली. नागपूर लाचलुचपत विभाग चे मार्गदर्शक अनामिका मिर्झापुरे (DYSP, नागपूर), गीता चौधरी, अस्मिता मेश्राम,  सारंग बालपांडे यांना उपस्तीथ नागरिकांनी आभार व्यक्त करून ध्यावाद मानले.

प्रतिनिधी: प्रा. निता ईटनकर,पारशिवनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या