Advertisement

मावळमध्ये राबवित असलेल्या "शासन आपल्या दारी" उपक्रमाचे अल्पसंख्याक विकास मंत्री ना.नवाबजी मलिक यांच्याकडून कौतुक

मावळमध्ये राबवित असलेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमाचे अल्पसंख्याक विकास मंत्री ना.नवाबजी मलिक यांच्याकडून कौतुक

पुणे:- ला फॅब्रिका एक्स्टरर्स आफताब सय्यद यांच्या नुतन ऑफिसचे उद्घाटन अल्पसंख्याक विकासमंत्री ना.नवाबजी मलिक यांच्या हस्ते वडगाव मावळ येथे संपन्न झाला.

यावेळी ते बोलतअसताना तालुक्यातील मुस्लिम बांधवांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमी बांधील राहू तसेच अल्पसंख्यांक विकास,कौशल्य विकास, युवकांना रोजगाराची संधी, शासकीय योजना राबवाव्यात अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी पुढाकार घ्यावा असे ना.नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
तसेच मावळमध्ये राबवित असलेल्या शासन आपल्या दारी उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, सुभाषराव जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती बाबुराव वायकर, नगरसेवक गणेश खांडगे,चंद्रजीत वाघमारे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा पूजा वहिले, नगरसेविका वैशाली दाभाडे,पूनमजाधव, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे,देहुरोड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ॲड.कृष्णा दाभोळे, प्रवीण ढोरे,राजेश बाफना, प्रविण झेंडे, अतुल राऊत, विशाल वहिले, बाबुलाल नालबंद,सोमनाथ धोंगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी:- सुखदेव जाधव, पुणे

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या