Advertisement

अनुदानित आश्रम शाळा तळवली बारागाव येथे प्रहार संघटनेचा कार्यक्रम संपन्न

अनुदानित आश्रम शाळा तळवली बारागाव येथे प्रहार संघटनेचा कार्यक्रम संपन्न

मुरबाड:-

मुरबाड तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनी साठी संवाद सभा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमामध्ये दिव्यांग व्यक्तीला तसेच महिलांना मोफत शिलाई मशीन, टेबल फॅन ,व्हिलचेअर,छत्री, रेनकोट, साडी, लुगडे, अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले असून, महिलांसाठी गृह उद्योग,अपंग बचत गट , अपंग दाखला ऑनलाइन करणे ,समाज कल्याण योजनेचे फॉर्म भरणे , अशा प्रकारे या कार्यक्रमात वेगवेगळे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा मध्ये दोन अपंग व्यक्तीचे पंपई कापून वाढदिवस साजरे करण्यात आले यावेळेस अपंग दिव्यांग व्यक्तीने मोठा प्रतिसाद प्रमाणात दिला. तसेच टोकावडे पोलिस स्टेशनचे PSI संसारे यांच्याकडून व्हिलचेअरची मदत करण्यात आली.

या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे ज्योतीताई ठाकरे महिला आर्थिक विकास मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, माजी आमदार दिगंबर विशे, प्रहार अपंग क्रांती जिल्हा अध्यक्ष सोमनाथ घुडे , तालुका अध्यक्ष उत्तम घुडे, शरद पाटील, ज्ञानेश्वर शिंदे , इत्यदी मान्यवर प्रामुख्यानी उपस्थित होते.

प्रतिनिधी:- किरण कारभळ (टोकावडे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या