चिखलसे गावातील विविध विकास कामांसंदर्भात पुणे जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांची भेट
वडगाव मावळ:
चिखलसे गावात विविध विकास कामांना भरीव निधी दिल्यामुळे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी चिखलसे गावातील सार्वजनिक विहीर दुरुस्तीसाठी तात्काळ ३ लक्ष रुपये मदत दिली. तसेच अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या चिखलसे गावातील सिद्धार्थनगर मधील समाजमंदिर इमारतीसाठी पुढील काळात भरीव निधी, गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी देखील निधी उपलब्ध करून देण्याचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांनी आश्वासन दिले.
यावेळी चिखलसे ग्राम पंचायत सदस्या कल्याणी काजळे, स्वीस सहायक भारत गाडे, पुष्पा साळवे ,कविता साळवे, नमिता साळवे,पुजा साळवे,सुवर्णा साळवे,रेखा साळवे उपस्थित होत्या.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)


0 टिप्पण्या