शहराच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून शहराच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज – आमदार सुनिल शेळके
वडगाव मावळ:
विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहात बैठक संपन्न झाली.
यावेळी तळेगाव दाभाडे शहरात महालसीकरण अभियानाचे नियोजन करण्यात आले.
येणाऱ्या शुक्रवार दि.२४ रोजी जास्तीत जास्त केंद्रे निश्चित करून १०,००० लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवुन महालसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी आमदार शेळके म्हणाले जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून तरी शहराची विकासकामे करावीत, ३५ कोटी ८८ लाख रुपये मंजूर निधीपैकी एकही काम सुरू केलेले नाही.
शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन करूनही सत्ताधारीपक्षाच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,गटनेते,नगरसेवक अनुपस्थित राहिले हे शहराच्या हिताचे नाही. शहराच्या विकासासाठी सत्ताधाऱ्याना काही देणे घेणे नाही. राजकारण बाजूला ठेवून शहराच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत कलहामुळे नगराध्यक्ष,नगरसेवक एकत्र येत नाहीत. त्यामुळे विकासकामांना गती मिळत नाही.पुढील आठ दिवसात विकासकामांचे ठराव दिले तर आणखी १५ कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहील.
या बैठकीत
भुयारी गटार योजनेच्या कामांचा आढावा घेतला. मागील अनेक दिवसांपासून या कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.पाण्याची पाईपलाईनसाठी रस्ते खोदाई आणि पुन्हा ड्रेनेजसाठी रस्ते खोदाई होत आहे. यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी समन्वय ठेवून ही कामे पूर्ण केली पाहिजेत. दोन्ही योजना झाल्यानंतर रस्त्याचे काम करता येईल. संपूर्ण शहरात मोठे खड्डे रस्त्यावर दिसत आहेत.
फळेभाजी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही गाव ते स्टेशन रस्ता (नगरपरिषद समोरील रस्त्यावर) अनेक विक्रेते बसलेले दिसतात.
त्यामुळे रस्त्यावर गर्दी होते व याठिकाणी अपघाताचा धोका संभवतो. वर्दळीच्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने रस्त्याकडेला फेरीवाल्यांना बसण्यास नगरपरिषदेने मनाई करावी.त्यामुळे अपघातांना आळा बसेल.
नवीन गॅस शवदाहिनीसाठी ६० लाख रु.निधी उपलब्ध केला आहे. तळेगाव स्टेशन परिसरात ही शवदाहिनी उभारण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तळेगाव-चाकण रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सा.बां.विभाग,नगरपरिषद यांनी समन्वय ठेवून विद्युत खांब काढण्यासाठी वारंवार सूचना दिल्या आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा अपघात प्रमाण वाढले आहेत.यावर बैठकीत चर्चा झाली.
ग्रामदैवत डोळसनाथ मंदिराच्या सभामंडपाचे काम अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यासाठी निधी कसा उपलब्ध करता येईल यासाठी प्रयत्नशील आहे.
तळेगाव दाभाडे ऐतिहासिक शहराला साजेशी नगरपरिषदेची नवीन इमारतीसाठी सुमारे १४ कोटी ८० लाख रुपये निधी उपलब्ध झालेला आहे काम सुरू करण्यासाठी जुनी इमारतीचे स्थलांतर करावे अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी आमदार सुनिल शेळके,मुख्याधिकारी सतीश दिघे,विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे,मंगल भेगडे, संगीता शेळके, हेमलता खळदे, तालुका समन्वयक गणेश बागडे, सा.बां.उपअभियंता वैशाली भुजबळ, पोलीस निरीक्षक शहाजी पवार व इतर सर्व विभागाचे अधिकारी,उपस्थित होते.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)



0 टिप्पण्या