Advertisement

बहुजन मुक्ति पार्टी नागपुर शहर यूनिट मार्फत उप जिलाधिकारी अविनाश काकडे यांना लोक अदालत अथवा जनता दरबार शुरू करने साठी निवेदन देण्यात आले

नागपूर:- बहुजन मुक्ति पार्टी नागपुर शहर यूनिट मार्फत उप जिलाधिकारी अविनाश काकडे यांना लोक अदालत अथवा जनता दरबार शुरू करने साठी  निवेदन देण्यात आले.
कोरोना काळात लाकडाउन लावल्या नंतर शहरात कमीजास्त प्रमाणात अनलॉक केले जात आहे. परंतु यादरम्यान अनेक शासकीय कार्यालयात मनमर्जीचे वातावरण वाढत चालले आहे. महानगर पालिका सिविल कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय किंवा नगर भूमापन कार्यालय, सिटी सर्वे कार्यालया सहीत अनेक शासकीय कार्यालयात असेच हाल पहायला मिळत आहे.

अनेक दिवसापासून अनेक अधिकारी व कर्मचारी कोवीड 19 च्या शासकीय निर्देशांचे बहाने करून कार्यालयात उपस्थित राहात नाही. काही कार्यालयाच्या बाहेर तर नागरीकांना भेटण्याचे वेळेचे बाबतीत बोर्ड लावण्यात आलेले असते. परंतु त्या वेळेवर नागरिक भेटण्यास गेल्यावर अधिकारी वा कर्मचारी भेटत नाही. साहेब साइटवर आहेत- बिझी आहेत असे सांगितले जाते. लहान सहान कामासाठी गरिबांना आपला वेळ व पैसा गमवावा लागत आहे. घुस देवुन कामे करवून घेणाऱ्यांचे तर फोनवरच कामे पूर्ण होतात. परंतु जे घुस देउ शकत नाही अशांना कार्यालयाच्या चकराच घालाव्या
लागतात. आणि याचा गैरफायदा कमिशन घेऊन काम करणारे दलाल प्रवृत्तीचे लोक घेत आहेत.
त्यामुळे लाकडाउन व बेरोजगारीने दुर्बळ झालेल्या नागरीकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ह्या त्रासापासून सामान्य नागरिकांची सुटका करण्यासाठी पूर्वीप्रमाणे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत लोक अदालत किंवा जनता दरबार सुरू करावी.

निवेदन देण्याऱ्या प्रतिनिधिमंडळात जावेद सय्यद, अनिल नागरे, विजय वानखेडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या