महावितरण कार्यालयावर शिवसेनेची धडक
लाडज शेतशिवारातील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा पुर्ववत करण्याची मागणी
ब्रम्हपुरी/चंद्रपूर:-ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज हे गाव वैनगंगा नदीच्या पाण्याने चहोबाजूने वेढलेले असल्यामुळे येथे पंपाशिवाय शेतशिवाराला पाणी देण्याची दुसरी कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे येथील शेतकर्यांना विहीरी व नदीच्या पाण्यावर विद्युत कृषी पंप लावूनच शेती करावी लागते. ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या लाडज शेतशिवारात कृषी पंपाचा विद्युत पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून बंद होता. त्यामुळे या लाडज शेतशिवारातील शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत नव्हते. पाण्याअभावी या शेतशिवारातील गर्भाशयात आलेले धान पिक करपण्याच्या मार्गावर होते. तसेच बरडकिन्ही शेतशिवारातील ट्रान्सफार्मर गेल्या अनेक दिवसांपासून नादूरूस्त स्वरूपात होते़ त्यामुळे सदर परिसरातील शेतकर्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत नव्हता. विद्युत पुरवठ्या अभावी येथील शेतशिवारात पाणी उपलब्ध होत नव्हते.
सदर समस्येची शिवसेनेचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर प्रा.अमृत नखाते यांनी दखल घेत, शिवसैनिक, लाडज, पिंपळगांव भो., सोंदरी, चिखलगांव व बरडकिन्ही येथील शेतकर्यांसमवेत कृषी पंपाचा विद्युत पुरवठा पुर्ववत करण्याच्या मागणीसाठी ब्रम्हपुरी येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. प्रसंगी महावितरण कार्यालयाचे प्र.कार्यकारी अभियंता गावडे मॅडम व सहाय्यक अभियंता एस.व्ही. रामटेकर उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर प्रा.अमृत नखाते यांनी लाडज व बरडकिन्ही येथील शेतशिवारातील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्याची मागणी केली. सदर मागणीची महावितरण कार्यालयाचे प्र.कार्यकारी अभियंता गावडे मॅडम व सहाय्यक अभियंता एस.व्ही. रामटेकर यांनी दखल घेत विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी केवळराम पारधी उपतालुका प्रमुख तथा सरपंच सोंदरी, रमाकांत अरगेलवार ब्रम्हपुरी, शामराव भानारकर माजी शहरप्रमुख, नकटूजी मैंद, मनोहर राऊत,भोजराज मिसार,सुरेश आडकीने ग्रा.पं.सदस्य,वसंता मिसार, हेमराज कामडी माजी उपसरपंच, भाष्कर दोनाडकर, संजू भूते, गोलू ठाकरे, प्रितम बागडे, आनंदराव मिसार, मुखरू राऊत, दादाजी ढोंगे, राजू राऊत, प्रकाश दोनाडकर, जयराम देवढगले, मारोती बनकर, मोरेश्वर मिसार आदी. शिवसैनिक व शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी:- राहुल भोयर(ब्रम्हपुरी)


0 टिप्पण्या